Jalgaon District News: महावीर पतपेढीच्या कर्जावर हमी असल्याने सुरेश जैन यांच्यावर जप्ती; जिल्हा बँकेचा खुलासा

Jalgaon District Bank
Jalgaon District Bankesakal
Updated on

Jalgaon District News : महावीर पतपेढीने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या आठ कोटी रुपयांच्या कर्जाच्या हमीपत्रावर सुरेश बन्सीलाल जैन यांची स्वाक्षरी आहे. त्यामुळे त्यांच्या हिश्‍यापुरत्या त्यांच्या मालमत्तेवर जप्ती बोजा बसविला आहे.

याची त्यांना माहिती असताना ते बँकेची बदनामी करीत असल्याचे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विशेष वसुली अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जिल्हा बँकेतर्फे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे, की सुरेश बन्सीलाल जैन यांनी कुठल्याही विषयाची शहनिशा न करता स्वतः महावीर अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष असताना माहिती असतानाही खोट्या स्वरूपाचे कथन करून बँकेची बदनामी केली आहे. (Seizure against Suresh Jain for defaulting on loans of Mahavir Patpedhi jalgaon district bank news)

जळगाव येथील महावीर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीने २००२ मध्ये जिल्हा बँकेकडे रीतसर मागणी करून दहा कोटी रुपये कर्ज मागणी केली होती. त्या विनंतीनुसार बँकेने आठ कोटी रुपये कर्ज मंजूर केले होते. कर्ज मंजूर करताना बँकेच्या नियमानुसार हमीपत्रासह सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे, त्या हमीपत्रावर सुरेश बन्सीलाल जैन यांची स्वाक्षरी आहे. त्यावेळी ते पतसंस्थेचे संचालक होते.

जिल्हा बँकेने महावीर अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीने कर्ज थकविल्यामुळे संस्था संचालकांविरुद्ध सहकार न्यायालयात दाद मागून बँकेस ९८ (ब) चे वसुलीचे प्रमाणपत्रात सुरेश बन्सीलाल जैन यांच्यासह महावीर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी, मनीष जैन, सुरेंद्र लुंकड, सुभाष सांखला, सुरेश टाटिया, महेंद्र शाह, अजित कुचेरिया, तुळशीराम बारी, सपना शाह व सपना राका यांच्या नावाचा समावेश आहे.

९८ (ब ) प्रमाणपत्र विरोधात छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालय खंडपीठात संबंधितांनी अपील दाखल केले होते. न्यायालयाने ते फेटाळून बँकेच्या बाजूने निर्णय दिला होता.

Jalgaon District Bank
Jalgaon News: जमिनीवरची नोट पापण्यांनी उचलतात होलार बांधव; खानदेशातील अनोखी कला

याच कर्जाच्या एका प्रकरणात १३८ अन्वये काही संचालकांना एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने दिली आहे. अशा प्रकारे खोटे मूल्यांकन दाखले व उतारे कामी न्यायालयात त्यांच्या विरोधात वाद प्रलंबित आहेत.

बँकेला ९८ (ब) चे प्रमाणपत्र मिळाल्यावर बँकेने सहकार कायद्यानुसार १०७ (३) ची थकबाकी मागणी १५६-१(ई) ची जप्ती पूर्वीची समज नोटीस तद्‍नंतर १०७(५) जंगम जप्तीची नोटीस पाठविण्यात आली आहे. बँकेने १०७ (१०) जप्ती आदेशाव्दारे बँकेच्या मालमत्तेवर आणि तत्कालीन संचालकांच्या मालमत्तेवर जप्ती बोजा बसविण्यात आले आहे. त्यामध्ये सुरेश बन्सीलाल जैन यांच्या मौजे मेहरुण गट क्रमांक ४३६/१/पैकी प्लॉट क्रमांक ३५ चे क्षेत्र २३२.५५ चौरस मीटर मालमत्तेवर त्यांच्या हिश्‍यापुरता जप्ती बोजा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा बँक सहकारी कायद्यानुसार कारवाई करीत शेतकऱ्यांचा कष्टाचा व हिताचा पैसा वसूल करण्याकामी अजून कठोर कारवाई करेल. बँक बदनामीप्रकरणी संबंधितावर लवकर गुन्हा दाखल करण्यात येईल. कर्ज बुडविणाऱ्यांवर लिलावाची व ताब्याची प्रक्रिया करून बँकेचा पैसा वसूल करण्यात येईल, असेही जिल्हा बँकेच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Jalgaon District Bank
Medical Courses Admission: प्रवेश मुदतवाढीसाठी ‘अभाविप’चे ‘सीईटी सेल’ला साकडे; बीएएमएस, बीएचएमएसचा प्रवेश घोळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.