Jalgaon Crime News : झंडू बाम, आयोडेक्स, ईनो, हार्पिकचा नकली माल जप्त; साडेसहा लाखांचा ऐवज जप्त

Police inspector Jaipal Hire and team along with fake goods seized from Jayaprakash Dara and Akash Balani on Wednesday.
Police inspector Jaipal Hire and team along with fake goods seized from Jayaprakash Dara and Akash Balani on Wednesday.
Updated on

Jalgaon Crime News : बहुराष्ट्रीय कंपन्यांची रोजच्या उपयोगातील उत्पादने हुबेहुब नकली बनवुन ग्राहकांसह थेट दुकानदारांना निम्म्या किमतीत विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. नेहरुनगर, मोहाडी येथे केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३ लाख ५८ हजार ७२८ रुपयांचा माल आणि ३ लाखांचा टेम्पो जप्त केला.

या प्रकरणी सिद्धेश सुभाष शिर्के (वय ३१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गोरेगाव, मुंबई येथील नेत्रिका कंन्सल्टींग इंडीया प्रा. लि. या कंपनीने ईमामी, हेलॉन युके, हिंदुस्थान युनीलिवर अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांशी टायअप केले आहे. (Seizure of fake goods like Zandu Balm Iodex Eno Harpic by police jalgaon crime news)

मंगळवारी (ता. १२) श्री. शिर्के यांच्यासह राकेश सावंत, सचिन गोसावी, अनील मोरे आदींच्या पथकाने नेहरुनगर परिसरात तपासणी केली. त्यावेळी जयप्रकाश नारायण दारा (रा. नेहरुनगर) व आकाश राजकुमार बालाणी (रा. गायत्रीनगर) हे दोघे, इमामी, झंडू, संभाजी बिडी आदींचा बनावट माल सर्रास विक्री करत होते.

संपुर्ण माहिती घेतल्यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत जिल्‍हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांना लेखी पत्र दिले. त्यामुळे एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सचिन मुंडे, राजश्री बाविस्कर, रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, विशाल कोळी, राहुल रगडे, छगन तायडे यांच्या पथकाने जयप्रकाश दारा (रा. प्लॉट नंबर १००) याच्या घराची व घराबाहेर उभ्या वाहनाचीही झडती घेतली. त्यात हा बनावट माल आढळल्याने, पोलिसांनी मालासह टेम्पो (एमएच १९, ईए ५९९६) जप्त करुन दोघांना ताब्यात घेतले.

निम्म्या दरात विक्री

दारा व बालाणी हे मालवाहु गाडीत नकली माल भरुन जिल्ह्यात विवीध ठिकाणी कटलरी दुकानदारांना तो विक्री करत होते. त्यावेळी ते, हा माल आम्हाला कंपनीतील सेटींगद्वारे निम्म्या दरात मिळतो, तुम्ही छापील किंमतीत विकु शकता, असे आमीष द्यायचे. या माध्यमातून ते दुकानदार व ग्राहकांचीही फसवणुक करत असत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Police inspector Jaipal Hire and team along with fake goods seized from Jayaprakash Dara and Akash Balani on Wednesday.
Jalgaon Crime News : शहराच्या मध्यवर्ती भागात कुंटणखाना; बसस्टॅण्डशेजारील लॉजवर छापा

जप्त केलेला नकली माल

उत्पादन किंमत (रूपये) एकुण माल

इनो १६,५६० १५३६ पाऊच

झंडूबाम ७१,२८० १६२० बॉटल

आयोडेक्स ४२,२४० १०५६ बॉटल

हार्पिक १९ हजार २०८ बॉटल

डेटॉल साबण १,२९,१९५ ७८३ गट्टे

डव्ह शॅम्पू २६,८८० १२,४४० पाऊच

सर्फ एक्सेल ९,६०० ९६० पाऊच

साबळे बिडी २३,७०० ६० बॉक्स

यांसह टाटा इंन्ट्रा ही मालवाहू गाडी, असा एकुण ६ लाख ३८ हजार ७९९ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

Police inspector Jaipal Hire and team along with fake goods seized from Jayaprakash Dara and Akash Balani on Wednesday.
Jalgaon Crime News : बालसुधारगृहातील 10 वर्षीय बालकावर अत्याचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.