अमळनेर : ‘ग्लोबल आडगाव’ या मराठी चित्रपटाची निवड अमेरिकेतील न्युजर्सी मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती खानदेशचे भूमिपुत्र उद्योजक अमृत मराठे यांनी केली असून, कोलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट देशविदेशातील अनेक नामांकित लोकांनी पाहिला अन् उदंड प्रतिसाद दिला.
सिल्वर ओक फिल्म्स ॲन्ड इंटरटेनमेंट प्रस्तुत, उद्योजक मनोज कदम निर्मित, उद्योजक अमृत मराठे सहनिर्मित आणि डॉ. अनिलकुमार साळवे लिखित व दिग्दर्शित ‘ग्लोबल आडगाव’ चित्रपट आहे. हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुराग बसू, कांतारा चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक निरीक्षित देव तर परीक्षक साजीयन कडोनी यांनी चित्रपटाची बांधणी, कलाकारांचा नैसर्गिक अभिनय, तंत्रशुद्ध बांधणी आणि दिग्दर्शनाचे प्रचंड कौतुक केले. (Selection of Global Adgaon movie in America Jalgaon News)
अमेरिकेत होणाऱ्या न्युजर्सी या अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवीन वर्षात हा चित्रपट दाखविला जाणार आहे. या वेळी हॉलीवूड, बॉलीवूडमधील नामांकित दिग्दर्शक आपली हजेरी लावणार आहे.
‘ग्लोबल आडगाव’ हा पूर्ण लांबीचा चित्रपट केला आहे. या चित्रपटाचे दोन प्रिव्हू पुणे व मुंबईत झाले. समीक्षकांनी भरभरुन कौतुक केले. या चित्रपटात उत्कंठावर्धक कथासूत्र, उपहासात्मक, मर्मभेदी असलेला हा चित्रपट म्हणजे शेती मातीतल्या पिढ्यांची जीवधरणी घुसमट आहे.
हे आहेत कलाकार
या चित्रपटात अभिनेता सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, अनिल नगरकर, उपेन्द्र लिमये, रोनक लांडगे, अशोक कालगुडे, सिद्धी काळे, महेंद्र खिल्लारे, अनिल राठोड, संजीवनी दिपके आदींच्या मुख्य भूमिका आहेत.
अमृत मराठेंचा थक्क करणारा प्रवास
ग्लोबल आडगाव चित्रपटाचे सहनिर्मिता असलेले अमृत मराठे हे उद्योजक असून, त्यांचा रोटवद (ता.धरणगाव) या छोट्याशा खेड्यात प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्याच्या घरी जन्म झाला. अमृत मराठे यांनी उदरनिर्वाहासाठी अनेक कंपन्या आणि मिळेल त्या ठिकाणी कामे केली. नोकरीसाठी औरंगाबाद गाठले. तिथे हॉस्टेलवर राहून शिक्षण घेत कामे केली. अहोरात्र मेहनत घेतली आणि छोटासा उद्योग सुरू केला.
त्या उद्योगाला बळ दिले. अखंड मेहनत, प्रामाणिकता आणि सातत्य ठेवल्याने लघुउद्योगाचे मोठ्या उद्योगात रुपांतर झाले. असंख्य हातांना कामे दिली आणि ॲपेक्स इंजिनिअर्स कंपनीचे अनभिक्त सम्राट झाले. महाराष्ट्रासह भारतभर त्यांचा नावलौकिक झाला. आता उद्योगासोबतच चित्रपट क्षेत्रात उद्योजक मनोज कदम व अमृत मराठे यांनी मिळून ग्लोबल आडगाव चित्रपट निर्मित केला. सोबत जळगाव जिल्ह्यातील सोमनाथ मराठे, जानकिराम पाटील, चेतन महाजन, कैलास पाटील, त्र्यंबक पाटील, नीलेश पाटील यांनी चित्रपटात भूमिका केल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.