Jalgaon News : कारागृहात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र बॅरेक; क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांना मिळणार दिलासा

District Superintendent of Police M. Rajkumar, Jail Superintendent Anil Gaddekar, Jail Superintendent Gajanan Patil, S. P. Kanwar etc.
District Superintendent of Police M. Rajkumar, Jail Superintendent Anil Gaddekar, Jail Superintendent Gajanan Patil, S. P. Kanwar etc.esakal
Updated on

Jalgaon News : जळगाव जिल्‍हा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक बंदी असल्याने अनेक वेळा कारागृह प्रशासनाला व्यवस्था सांभाळणे जिकिरीचे जाते.

वारंवार पाठपुरावा केल्यानंतर जिल्‍हा व नियोजन समितीकडून कारागृहात नवे चार बॅरेक बांधण्यासाठी ७२ लाखांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच बांधकामाला सुरवात होणार आहे. जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते या कामाचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले. (separate barracks for third gender in jail jalgaon news)

जळगाव जिल्हा कारागृहासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ७२ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्यातून नवीन चार बॅरेक तयार केल्या जाणार आहेत. यात दोन ४० क्षमतेच्या पुरुष बॅरेक, एक महिलांसाठी व एक तृतीयपंथी कैद्यांसाठी देखील राखीव करण्यात येणार आहे. कारागृहात सध्या कैद्यांची क्षमता ५०० च्या वर जात आहे.

त्यामुळे कैदी ठेवण्याच्या क्षमतेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी नवीन चार बॅरेक निर्माण झाल्याने कारागृहातील वाढत्या गर्दीत कैद्यांना दिलासा मिळणार आहे. कारागृह यंत्रणेचा ताण थोडा का होईना कमी होणार आहे.

District Superintendent of Police M. Rajkumar, Jail Superintendent Anil Gaddekar, Jail Superintendent Gajanan Patil, S. P. Kanwar etc.
Jalgaon ZP News : जिल्हाधिकारी जेव्हा विद्यार्थी बनतात; जि.प.शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी साधला संवाद

उभारण्यात येणाऱ्या या चार बॅरेकमध्ये जवळपास शंभरापर्यंत कैदी सामावून घेतले जातील, इतकी क्षमता असल्याचे सांगण्यात आले.

भूमिपूजनप्रसंगी जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यासह कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर, तुरुंग अधीक्षक गजानन पाटील, तुरुंग अधीक्षक एस. पी. कन्वार, सुभेदार, हवालदार, रक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता महाजन यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

District Superintendent of Police M. Rajkumar, Jail Superintendent Anil Gaddekar, Jail Superintendent Gajanan Patil, S. P. Kanwar etc.
Jalgaon News : पारोळ्यात समांतर रस्त्यांअभावी वाहतुकीची दैना; ‘बायपास’लगत कामे कासवगतीने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.