जळगाव : व्यापाऱ्याला दुचाकीचा कट मारल्याचा बहाणा करून त्याच्याजवळील आठ लाखांची रोकड लांबविणाऱ्या पाच संशयितांना शुक्रवारी (ता. २७) दुपारी अटक करण्यात आली.
एमआयडीसी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांमध्ये एक व्यापाऱ्याच्या दुकानातील नोकर असल्याचे सांगितले जात आहे.
सिंधी कॉलनीतील व्यापारी ईश्वर बालू मेंघाणी यांचे दाणाबाजारात बाबा हरदासराम ट्रेडर्स नावाचे होलसेल मालाचे दुकान आहे. २३ जानेवारीस रात्री साडेनऊच्या सुमारास ते दुकान बंद करून उधारी व माल विक्रीचे सुमारे ८ लाखांची रोकड, लॅपटॉप, मोबाईल, चार्जर व हार्डडिस्क घेऊन घरी जात होते. (Servant is master mind in robbery of eight lakhs Merchant booty Five people arrested for stealing Jalgaon News)
रामदेवबाबा मंदिरासमोर दोन जण दुचाकीने येऊन त्यांच्या दुचाकीला कट मारला. यातील एकाने त्यांच्या दुचाकीस लावलेली ८ लाख रुपयांची पिशवी व मुद्देमाल जबरी हिस्कावून चोरून नेला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनात तीन पथके नेमली होती.
टोळीचा पर्दाफाश
पोलिसांनी तांत्रिक मदतीचे आधारे टोळीचा पर्दाफाश केला. या गुन्ह्यात एकूण पाच जणांना शुक्रवारी (ता. २७) दुपारी तीनच्या सुमारास वेगवेगळ्या भागातून अटक केली. पोलिसांनी पाचही संशयितांची नावे गोपनीय ठेवली आहेत. संशयितांकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.