Jalgaon Crime News : खडके बुद्रुक (ता. एरंडोल) येथील अनाथ बालकांच्या बालगृहातील नऊ ते बारा वर्षे वयोगटातील पाच अल्पवयीन बालिकांवर वसतिगृहातील काळजीवाहक पदावर असलेल्या कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
एरंडोल पोलिसांत काळजीवाहक, अधीक्षक व सचिव अशा तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी वसतिगृहातील काळजीवाहक व त्याची पत्नी तथा अधीक्षक यांना अटक केली असून, संस्थेचा सचिव असलेला तिसरा संशयित फरारी झाला आहे. (sexual assault of minor girls in orphanages in erandol jalgaon crime news)
अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीश राजूरकर यांनी काळजीवाहक कर्मचाऱ्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी, तर त्याची पत्नी तथा वसतिगृह अधीक्षक हिला न्यायालयीन कोठडी सुनावली.
अशी आहे घटना
खडके बुद्रुक येथे अनाथ मुलांचे बालगृह असून, याठिकाणी अनाथ अल्पवयीन मुले व मुलींना संगोपनासाठी ठेवण्यात येते. बालगृहात असलेल्या पाच ते बारा वयोगटातील पाच मागास समाजाच्या अल्पवयीन मुलींवर संस्थेच्या काळजीवाहक पदावर असलेल्या गणेश शिवाजी पंडित याने अत्याचार केल्याची तक्रार पीडित बालिकांनी बालकल्याण समिती, जळगाव यांच्याकडे केली.
माहितीचे व्हिडिओ चित्रण
बालकल्याण समितीच्या सदस्या वैशाली विसपुते यांनी बालिकांनी त्यांच्यावर झालेल्या कथन केलेल्या अत्याचाराची माहिती मोबाईलमध्ये शूटिंग करून घेतली. या वेळी बालकल्याण समिती सदस्या ॲड. विद्या बोरणारे, देवयानी गोविंदवार याही उपस्थित होत्या. जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी डॉ. वनिता डी. सोनगत यांनी एरंडोल पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यावर निरीक्षक सतीश गोराडे यांनी उपनिरीक्षक शरद बागल यांना चौकशी करण्यास सांगितले.
बुधवारी (ता. २६) रात्री नऊच्या सुमारास चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदनवाळ यांनी खडके बुद्रुक येथे बालगृहात जाऊन घटनेची माहिती जाणून घेतली.
पोलिस उपनिरीक्षक शरद बागल यांनी जळगाव येथे बालकल्याण समितीच्या सदस्या विसपुते यांची भेट घेऊन माहिती जाणून घेतली. बालगृहातील पाच अल्पवयीन बालिकांवर ऑगस्ट २२ ते जून २३ या कालावधीत संस्थेतील काळजीवाहक पदावर असलेला कर्मचारी गणेश शिवाजी पंडित याने अनेकदा अत्याचार केले असल्याचे निष्पन्न झाले.
अधीक्षक, सचिवांचे दुर्लक्ष
अत्याचार पीडित बालिकांनी त्यांच्यावर गणेश पंडित याच्याकडून होत असलेल्या अत्याचाराची माहिती वसतिगृहाचे अधीक्षक व सचिव यांना दिली असतानाही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
.. अखेर गुन्हा दाखल
याबाबत उपनिरीक्षक शरद बागल यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेश पंडित, अरुणा पंडित आणि संस्थेचे सचिव भिवाजी पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गणेश व अरुणा पंडित यांना अटक केली असून, सचिव भिवाजी पाटील फरारी आहे.
विद्यार्थिनी बालगृहात दाखल
खडके बुद्रुक येथील अनाथ मुलांच्या बालगृहात १९ विद्यार्थिनी होत्या. संस्थेला शासनाकडून अनुदान प्राप्त होत नसल्याचे कारण देत ते बंद करण्याबाबत संस्थेकडून नोव्हेंबर २०२२ पासून बालकल्याण समिती यांचेकडे पत्रव्यवहार करण्यात येत होता.
संस्थेने बालगृह बंद करण्याबाबत केलेल्या पत्रव्यवहारामुळे बालकल्याण समितीच्या सदस्यांनी १९ पैकी आठ बालिकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले होते; तर उर्वरित ११ बालिकांना जिल्हा परीविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचालित मुलींचे बालगृह, जळगाव येथे तात्पुरत्या स्वरूपात दाखल करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.