Sharad Pawar on K. Chandrashekhar Rao: के. चंद्रशेखर राव यांची BRS सत्ताधाऱ्यांची B टीम : शरद पवार

Sharad Pawar on K. Chandrashekhar Rao
Sharad Pawar on K. Chandrashekhar Raoesakal
Updated on

Sharad Pawar on K. Chandrashekhar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष हा राज्यातील सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाची ‘बी’ टीम असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला आहे. अमळनेर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. (Sharad Pawar statement on K Chandrasekhar Rao BRS B Team of BJP jalgaon maharashtra politics news)

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ग्रंथालय सेलच्या अधिवेशनानिमित्ताने शरद पवार हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर दौऱ्यावर आहेत. अमळनेरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आमदार एकनाथ खडसे, अनिल पाटील आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले कि, मागच्या निवडणुकीत आम्हाला वंचित आघाडीचा मोठा फटका बसला होता, त्यामुळे यावेळीही तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाला महाराष्ट्रात आणण्याची खेळी राज्यातील सत्ताधाऱ्यांची असावी, असे आम्हाला वाटते त्यामुळे बीआरएस हा पक्ष सत्ताधाऱ्यांची ‘बी’ टीम असण्याची शक्यता आहे.

के चंद्रशेखर राव हे अगोदर विरोधी पक्षाकडे आले त्यांनी आम्हाला साथ देण्याचे आवाहन केले होते. मात्र आता ते वेगळीच चाल खेळत आहे. ते महाराष्ट्रात येत असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचीच लोक फुटत आहे.

त्यामुळे ही राज्यातील सत्ताधाऱ्यांची चाल असू शकते. मागच्या वेळी आम्हाला वंचित आघाडीचा फटका बसला, यावेळी ‘बीआरएस’ चा फटका काही प्रमाणात बसू शकतो, असे वाटते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sharad Pawar on K. Chandrashekhar Rao
Chandrashekhar Rao : 'अबकी बार किसान सरकार' नांदेडमध्ये चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा

नाफेड, सीसीआयने कापूस खरेदी करावी

राज्यात अद्यापही ५० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, कि यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला आहे, सोयाबीनच्या बाबतही हीच स्थिती आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची ग्वाही सरकारने दिली होती.

मात्र आज हमीभाव देखील शेतकऱ्यांना मिळत नाही. कापसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. नाफेडला कापूस खरेदीसाठी पुढे आणलं पाहिजे किंवा सीसीआय मार्फत खरेदी केली पाहिजे. शेतकऱ्यांना कापसाचे अनुदान देवून त्यांना मदत केली पाहिजे.

Sharad Pawar on K. Chandrashekhar Rao
Sharad Pawar Threat : शरद पवार धमकी प्रकरणात 'ते' आरोप भोवणार! सुप्रिया सुळे, रोहित पवारांविरोधात मानहानीचा दावा

कायदा सुव्यवस्था धोक्यात

राज्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचा आरोप शरद पवार यांनी केला, ते म्हणाले, कि राज्यात काही दिवसापूर्वी दहा ते पंधरा ठिकाणी कायदा हातात घेतला जात असल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारने याची जबाबदारी घेऊन सामंजस्य निर्माण केले पाहिजे.

महाराष्ट्रात खोक्याचा वापर

मध्यप्रदेश, गोवा येथे आमदार फोडून भाजपने आपले राज्य आणले, असा आरोप करून ते म्हणाले कि, महाराष्ट्रातही मविआ सरकार पाडण्यासाठी खोक्यांचा वापर करण्यात आला.

Sharad Pawar on K. Chandrashekhar Rao
Sharad Pawar : वंचित, BRS पायात पाय घालण्यासाठी तयार केलेली बी टीम ; शरद पवार असं का म्हणाले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.