जळगाव : पुरुषी परंपरेला फाटा देत पिंप्राळ्यातील इंद्रदेवजीनगरात महिलांनी पुढाकार घेऊन दुर्गोत्सव सुरू केला आहे. नारीशक्ती दुर्गोत्सव महिला मंडळ या नावाने हा उत्सव सुरू करण्यात आला आहे. शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर जयश्री महाजन यांनी मंडळाला भेट देऊन महिलांचा उत्साह वाढविला. त्यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली.
गणेशोत्सव व दुर्गोत्सवात पुरुषच पुढाकार घेऊन उत्सव साजरा करतात. सण-उत्सव म्हटले, की तरुणांचा उत्साह शिखरावर असतो. पुरुषी मक्तेदारी मोडून काढत महिलांनी पुढाकार घेतला अन् उत्सवाला सुरवात केली.(Shardiya Navratri 2022 Celebrating by women by garba and dandiya with Jayshree Mahajan jalgaon news)
महिलांचा उत्साह आणि पुढाकार पाहून आपणासही हायसे वाटल्याचे महापौर महाजन म्हणाल्या. त्यांनी मंडळाच्या कारभारीण महिलांचे कौतुक करतच उत्साहाला फोडणी दिली. या मंडळात एकाही पुरुषाचा सहभाग नाही हे विशेष. संपूर्ण नियोजन महिलांनीच केले आहे. मंडळाचे प्रथमच वर्ष आहे. सीमा पाटील यांनी महापौर जयश्री महाजन यांचे स्वागत केले.
गरबा दांडियाचा जल्लोष
मंडप, गरबा दांडिया खेळण्यासाठी छत्रीचा घेर अशा सर्व नियोजनात महिला आणि मुलींनीच पुढाकार घेतला. त्यात हेमांगी कुमावत, विद्या सहारे, ज्योती बारी, कविता बारी, जया पाटील, चित्रा शिंदे, मनीषा पाटील, सुनीता जगताप, शीतल सुर्वे, मेघा वाणी, नेहा बाजपेयी, सरोज महाजन, ममता सैंदाणे व सुनीता उमराणे आदींच्या हातात नियोजनाची धुरा आहे. अगदी आरती, प्रसादवाटपापासून साउंड सिस्टिम, गरबा खेळणाऱ्या तरुणी-आजीबाईंना थिरकवणे ही सर्व कामगिरी याच महिलांकडे असल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरलेल्या या मंडळात रोज रात्री महिला-मुलींची गरबा खेळण्यासाठी गर्दी उसळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.