Shasan Aplya Dari : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमास लाभार्थ्यांना उपस्थितीची सक्ती नसतानाही समाजमाध्यमात गैरसमजाचे संदेश पसरविणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांनी निलंबित केला आहे.
शहरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ९, वॉर्ड क्रमांक २/१, शिवाजी नगर, (जळगाव) येथील स्वस्त धान्य दुकानाचा हा परवाना निलंबित करण्यात आला आहे. (shasan aplya dari License of misguided ration grain shop suspended jalgaon news)
स्वस्त धान्य दुकान परवानाधारक नवनाथ विश्वनाथ दारकुंडे यांनी शासनाचे प्रतिदायित्व व महाराष्ट्र अनुसूचित वस्तू वितरणाचे विनियमन आदेश, १९७५ मधील तरतुदीचा, तसेच प्राधिकारपत्रातील अटी व शर्तीचा भंग केलेला असल्याने त्यांचे स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र पुढील आदेशापावेतो निलंबित करण्यात आला आहे.
दारकुंडे यांच्या रेशन दुकानातून धान्य वितरण न करणे याबाबत तक्रारी पूर्वीच आल्या होत्या. आता त्यांनी ‘शासन आपल्या दारी’ या शासकीय कार्यक्रमाच्या नावाखाली व्हॉट्सअप ग्रुपवर २७ जूनला मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमास सर्व कार्डधारकांना हजर राहणे बंधनकारक आहे व जे रेशन कार्डधारक या कार्यक्रमास हजर राहणार नाहीत, त्या कार्डधारकांचे धान्य तीन ते चार महिने बंद करण्यात येईल, असा धमकी वजा इशारा दिलेला होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या कार्यक्रमात कार्डधारकांना महत्त्वाच्या सूचना देणार आहेत व तेथे कार्डधारकांची सर्वांची नोंद घेतली जाईल, त्यामुळे सर्व ग्राहकांनी हजर राहणे अनिवार्य आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमांच्या नावाखाली व्हॉट्सअप ग्रुपवर लाभार्थ्यांमध्ये दिशाभूल निर्माण करणारे मेसेज टाकलेले आहे. आदी कारणांवरून हा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.