Shasan Aplya Dari : शासकीय योजनांमुळे पालटले आयुष्य; लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया

Shasan Aplya Dari
Shasan Aplya Dari esakal
Updated on

Shasan Aaplya Dari : कोणाला रोजगार नव्हता, कोणी शेतमजुरी, हातकाम करून शिक्षण घेत होते. कोणाला जन्मतः कर्णदोष होता. कोणाला हात-पायाचे व्यंग होते. अशा उपेक्षित, वंचितांचे शासकीय योजनांमुळे आयुष्य पालटले आहे.

‘शासन आपल्या दारी’ या लोकाभिमुख उपक्रमात लाभार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (shasan aplya dari Reactions of beneficiaries whose lives have changed due to government schemes jalgaon news)

श्रवणशक्ती मिळाल्याने आयुष्य पालटले

साडेपाच वर्षांच्या रूदुराज गांगुर्डेला जन्मत: दोन्ही कानांनी ऐकू येत नव्हते. खासगी रुग्णालयात त्याच्या कानाच्या शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे सहा लाखापर्यंत होता. त्यांच्या उपचाराची आम्हाला चिंता सतत सतावत होती.

मात्र, राष्ट्रीय बालस्वास्थ्य अभियान योजनेच्या माध्यमातून पुण्याच्या खासगी हॉस्पिटलमध्ये काँक्रिलियर इम्प्लांटची अवघड शस्त्रक्रिया मोफत झाली. यामुळे रूदुराजला आता चांगले ऐकू येत आहे. तो हसतखेळत जगत आहे. त्याचे आयुष्य पालटले आहे, अशी भावना रूदुराजचे वडील वसंत गांगुर्डे, आई सरिता गांगुर्डे यांनी व्यक्त केली.

अगरबत्ती विक्रीतून आर्थिक बळ

पिंप्राळ्यात अगरबत्ती विक्रीतून उदरनिर्वाह करणाऱ्या सागर सुधाकर सुतार याला जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग सक्षमीकरण योजनेतून तीनचाकी सायकल मिळाली. त्याला आता त्याचा अगरबत्ती विक्री करण्यास नवीन बळ मिळणार आहे, असे त्याने सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shasan Aplya Dari
Shasan Aplya Dari : जिल्हास्तरावर जनकल्याण कक्षाची स्थापना; अभियानाच्या अंमलबजावणीसाठी नियोजन

स्वाधार योजनेमुळे कामापासून सुटका

मु. जे. महाविद्यालयात समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणारा यशवंत किशोर कुंवर (रा. रायखेड, ता. शहादा) खासगी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवत होता.

कामामुळे अभ्यासाला पुरेसा वेळ देता येत नव्हता. समाज कल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून यशवंतला पहिल्या वर्षी ३८ हजारांची आर्थिक मदत मिळाली. यामुळे यशवंतची वेटरच्या कामापासून सुटका झाली. आता त्याला अभ्यासाला ही पुरेसा वेळ देता येत आहे.

ट्रॅक्टर मिळाल्याने शेतीची मशागत शक्य

लोणखडी (जि. जळगाव) येथे लताबाई जुलाल पाटील यांची अडीच एकर बागायती शेती आहे. ते बैलजोडी व पारंपरिक अवजारांसह शेती करीत होत्या. शेतीमशागतीसाठी फार कष्ट घ्यावे लागत होते. त्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टरसाठी १ लाख २५ हजार रुपये मिळाले.

आता त्यांना ट्रॅक्टरद्वारे शेती मशागत करणे सहज शक्य झाले असून, त्यांच्या शेतात मका, कापूस पिकांचे उत्पादन घेत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Shasan Aplya Dari
Shasan Aplya Dari : सरकारी योजनांचा लाभ एकाच छताखाली

धनश्रीला एमएससीआयटीचे मोफत प्रशिक्षण

धनश्री सपकाळे टीवायबीएला शिक्षण घेत आहे. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळामार्फत अनुसूचित जातीच्या लाभधारकांना व्यवसाय, तसेच कौशल्य प्राप्त करून तांत्रिक व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन ते सहा महिन्यापर्यंत मोफत प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती तिला मिळाली.

धनश्रीने एमएससीआयटी संगणकाचा कोर्स करण्यासाठी महामंडळाकडे अर्ज केला. महामंडळामार्फत धनश्रीने तीन महिन्याचे शासनमान्य संस्थेत एमएससीआयटीचे प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केले. प्रशिक्षणासाठी धनश्रीला ३ हजार रुपयाचे विद्यावेतनही मंजूर झाले आहे.

गिरीशला मिळाला वैयक्तिक व्याज परतावा

गिरीश किशोर पाटील (जळगाव) याचे शिक्षण एमबीएपर्यंत झाले असून, वडील रिक्षा चालवितात. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने त्याने व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे कॅफेटिरीया चालविण्यासाठी कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला.

त्याला ५ लाखांचे कर्ज मंजूर झाले. कर्जाच्या त्या पहिल्या हप्त्याची नियमित परतफेड केल्यानंतर गिरीशला साडेपाच हजार रुपयांचा व्याज परतावाही महामंडळाकडून मंजूर झाला. गिरीशला ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा फायदा झाला.

Shasan Aplya Dari
Shasan Aapalya Dari : रेशनकार्ड काढायचे, क्यूआर कोड स्कन करा, फॉर्म भरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.