Jalgaon News : शेळगाव बॅरेजला मिळाली आणखी 12 हेक्टर जमीन; 100 टक्के पाणी साठणार

land
landesakal
Updated on

Jalgaon News : अनेक वर्षांपासून शेळगाव बॅरेज शंभरमध्ये पाणी साठण्यासाठी धरणाला अजून ११.९४ हेक्टर जमिनी हवी होती. ती जमीन नागपूर वन विभागाने दिली आहे. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करीत राज्य शासनाने अतिरिक्त जागेला परवानगी दिली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तीन महिन्यांत वन विभागाची जमीन मिळवून दिली. या अतिरिक्त जमिनीमुळे धरणात शंभर टक्के साठा होईल. (Shelgaon Beranj got another 12 hectares land from forest department jalgaon news)

तसेच जळगाव, यावल, भुसावळ, चोपडा गावांमध्येही सिंचनाची मोठी सोय होईल. अनेक पिढ्यांसाठी हे धरण उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पात असणाऱ्या ११.९४ हेक्टर वनजमीन अधिग्रहित करण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्यासाठी शासनाला नांदेडची जिल्ह्यातील महसूलची जमीन वन विभागाला द्यावी लागणार आहे. नांदेडचे जिल्ह्याधिकाऱ्यांचेही यात श्रेय आहे.

ही जमीन शेळगाव बॅरेजला मिळण्यासाठी २०१८ पासून प्रस्ताव प्रलंबित होता. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी याप्रकरणी पाठपुरावा केला. नागपूरच्या वनविभागाच्या बैठकीही घेतल्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करीत ही जमीन वन विभागाकडून मिळवली. केंद्राकडून हिरवा कंदील मिळताच शेळगाव प्रकल्पातील जलसाठा १०० टक्के क्षमतेने भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

land
Jalgaon News : मूळगावी जाताना महिन्याच्या बाळाच्या रेल्वेतील मृत्यूने दाम्पत्याचा आक्रोश

धरण परिसरात वनजमिनीच्या जागेमुळे शेळगाव धरणातील साठा पूर्णक्षमतेने भरण्यास अडचण येत होती. हा प्रस्ताव नवी दिल्ली येथे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

पाणीटंचाई मिटेल, सिंचनास मदत

शेळगाव बॅरेज तापी नदीवर आहे. यामुळे एक हजार १२८ हेक्टर शेतजमीनच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. जळगाव, भुसावळ येथील औद्योगिक विकास महामंडळ, खासगी औद्योगिक वसाहती, खासगी उद्योग, भुसावळ शहर, भुसावळ रेल्वे जंक्शन, रेल्वे वसाहतीसाठी धरणाच्या आसपास असलेल्या जळगाव, भुसावळ व यावल तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी हा प्रकल्प लाभदायी ठरणार आहे.

land
Jalgaon News : महापालिकेतील 86 कंत्राटी पदांच्या भरतीसाठी कट ऑफ यादी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.