जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेचे खाशाबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तर्फे तिसरा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे पार पडला.
या फेस्टिवलसाठी १०९ शॉर्टफिल्म आल्या, त्यातील विशेष ६२ शॉर्टफिल्म दाखवण्यात आलेत. (shetkari is best film of third Devagiri short film festival jalgaon news)
यातील संजय दैव दिग्दर्शक यांची ‘देशकरी’ ही उत्कृष्ट शॉर्ट फिल्म विजेती ठरली आहे. अरविंद जोशी यांची ‘पिलग्रीम ऑफ हतनूर’ उत्कृष्ट माहितीपटाचा मान मिळाला आहे.
‘द डील’ ने उत्कृष्ट कॅम्पस फिल्म ठरली. जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी दिग्दर्शक विजय लोटन पाटील, नितीन भास्कर, संगीतकार रोहित नागभीडे, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे रजिष्ठार डॉ. विनोद पाटील, सिनेट सदस्य राजेंद्र नन्नवरे.
उद्योगपती प्रकाश चौबे, प्रांत सह कार्यवाह स्वानंद झारे, ॲड. सुशील अत्रे, देवगिरी फिल्म चे प्रांत संयोजक किरण सोहळे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी विकास संचालक डॉ. प्रा.जयेंद्र लेकुरवाळे, विवेकानंद प्रतिष्ठानच्या शोभाताई पाटील उपस्थित होते.
५०० कोटींचा चित्रपट जो संदेश देऊ शकत नाही मात्र कमी खर्चात बनवलेल्या पाच मिनिटांच्या शॉर्ट फिल्म देतो ही ताकद आहे, असं मत अध्यक्ष जैन यांनी व्यक्त केले.
देवगिरी शॉर्ट फिल्मच्या उपक्रमात जैन उद्योग समूह कायम पाठीही राहील, असे आश्वासित केले. याप्रसंगी विविध संस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
सचिव डॉ. रत्नाकर गोरे, हेमलता अमळकर, विनीत जोशी, संजय हांडे, सुचित्रा लोंढे, संतोष सोनवणे, प्रा सचिन कुंभार, गौरव नाथ, पार्थ ठाकर, विवेकानंद प्रतिष्ठान विद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.