Shiv Maha Puran Katha: श्री शिवमहापुराण कथेने एसटीला 74 लाखांचे उत्पन्न

Shiv Mahapuran Katha 74 lakhs income of st bus jalgaon news
Shiv Mahapuran Katha 74 lakhs income of st bus jalgaon news
Updated on

Shiv Maha Puran Katha : पंडित प्रदीप मिश्रा यांची श्री शिवमहापुराण कथा वडनगरी फाटा भागात ५ ते ११ डिसेंबरदरम्यान झाली. कथेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाने जादा बसगाड्या सोडत सात दिवसात ७३ लाख ८७ हजार २३९ रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

बडे जटाधारी महादेव मंदिर परिसरातील कथेच्या सर्वच दिवस जिल्ह्यातूनच नव्हे, तर जिल्ह्याच्या बाहेरून भाविक येत होते. त्यात शेवटच्या चार दिवसांत कथा ऐकण्यासाठी आलेल्या भाविकांची संख्या ७ ते ८ लाखांच्यादरम्यान होती. (Shiv Mahapuran Katha 74 lakhs income of st bus jalgaon news)

भाविकांची ही गर्दी लक्षात घेता, जळगाव एस.टी. विभागाने विविध बसस्थानकातून थेट श्री शिवमहापुराण कथेच्या वाहनतळापर्यंत सोडण्यासाठी दररोज दोनशे बसगाड्यांचे नियोजन सुरुवातीला केला होते. मात्र भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता, ‘भरली की चालली' याप्रमाणे जळगाव विभागातील सर्वच आगारांतून बसगाड्या सोडण्यात आल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगणोर यांनी सांगितले.

६ हजार ६३२ बसफेऱ्या

जळगाव विभागातील सर्व ११ आगारांतून श्री शिवमहापुराण कथेसाठी जादा बसगाड्या सोडण्यात आल्या. ५ ते ११ डिसेंबर या सात दिवसांमध्ये विभागातून ६ हजार ६३२ बसफेऱ्या झाल्या. त्यामध्ये सर्वाधिक फेऱ्या जळगाव आगारातून १ हजार ८५० इतक्या झाल्या. सात दिवसात सुमारे साडेपाच लाखांपेक्षा अधिक भाविकांनी प्रवास केला आहे. एकूण झालेल्या फेऱ्यांमधून बसगाड्यांचा प्रवास २ लाख १० हजार ४४० किलोमीटर झाला आहे.

उत्पन्नात चोपडा आगार अव्वल

श्री शिवमहापुराण कथेसाठी सोडण्यात आलेल्या जादा बसफेऱ्यांमधून जळगाव विभागाला मिळालेल्या एकूण उत्पन्नामध्ये सर्वाधिक उत्पन्न चोपडा आगाराने मिळविले आहे. चोपडा आगारातून ९९६ फेऱ्यांमधून १९ लाख ७१ हजार ९३० इतके उत्पन्न मिळाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर यावल आगार राहिले असून या आगाराने १० लाख ५० हजार ८६३ इतके उत्पन्न मिळविले आहे.

Shiv Mahapuran Katha 74 lakhs income of st bus jalgaon news
Shiv Maha Puran Katha: सून- मुलाने वागवले नाही, तरी आई माफ करते : पंडित प्रदीप मिश्रा

आकडे बोलतात

आगार......... ....... बसफेऱ्या ..... .... ..... मिळालेले उत्पन्न रुपयांमध्ये

जळगाव .. .... .... .. १८५०....... .... ..... ९ लाख ३४ हजार ५२७

यावल......... ......... ८५८ ............ .......१० लाख ५० हजार ८६३

चाळीसगाव..............३६६.............. .......५ लाख ३२ हजार ३३४

अमळनेर ......... ......३६८ ............. .......४ लाख ९ हजार ६१०

चोपडा ......... .......९९६............. .......१९ लाख ७१ हजार ९३०

जामनेर ......... ........४१४............. .......५ लाख ४० हजार २३४

रावेर ......... ......... २४३ ............ .......४ लाख ६८ हजार २५

मुक्ताईनगर ......... ...४७८ ............ .......४ लाख २८ हजार ४५५

पाचोरा ......... ........२४६ ........... ....... ३ लाख ७२ हजार ५२०

भुसावळ......... .......३२६............. .......३ लाख ४००

एरंडोल ......... ....... ४८७ ............ .......३ लाख ७८ हजार ३४१

Shiv Mahapuran Katha 74 lakhs income of st bus jalgaon news
Shiv Maha Puran Katha: जळगावात भरला साडेसात लाख शिवभक्तांचा कुंभमेळा; शिवमहापुराण कथेस ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.