'सुषमा अंधारेंच्या नादाला लागू नका, अन्यथा कुंभारावानी चिखलासारखं तुडवल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही'

सुषमा अंधारेंनी गुजरातला गेलेल्या प्रकल्पांवरुन भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला.
Sushma Andhare Sharad Koli
Sushma Andhare Sharad Koliesakal
Updated on
Summary

सुषमा अंधारेंनी गुजरातला गेलेल्या प्रकल्पांवरुन भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला.

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची 'बाळासाहेबांची शिवसेना' म्हणजेच, शिंदे गटाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. केवळ शिवसेना नाही, तर काँग्रेस, राष्ट्रवादीमधीलही नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत.

Sushma Andhare Sharad Koli
Amit Shah : 'काँग्रेसच्या काळात जवानांचे शिरच्छेद, आम्ही पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांना उडवलं'

पक्ष संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) बैठका, दौरे यांवर भर देत आहेत. याच दरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांविरुध्द आक्रमक झाल्याचं पहायलाही मिळत आहे. जळगावातील महाप्रबोधन यात्रेत युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी (Sharad Koli) यांनी शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला.

Sushma Andhare Sharad Koli
दक्षिण कोरिया Kim Jong Un च्या पुन्हा रडारवर; उत्तर कोरियानं डागली 10 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं

जळगावातल्या या महाप्रबोधन यात्रेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे याही उपस्थित होत्या. यावेळी सुषमा अंधारे आणि शरद कोळी यांची तुफान भाषणं झाली. भाषणात भाजप आणि शिंदे गटावर फटकेबाजी केली. यात सगळ्यात जास्त गुलाबरावांवर टीका झाली. दरम्यान, पुन्हा सुषमा अंधारेंबाबत काही बोललं गेलं तर घरात घुसून मारू" अशी ताकीदच शरद कोळींनी दिली. तर, सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) गुजरातला गेलेल्या प्रकल्पांवरुनही भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. तुम्ही नादाला कोणाच्या लागताय माहितीय का? चुकून पण सुषमा अंधारेंच्या नादाला लागू नका, अन्यथा कुंभारावानी चिखल तुडवल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही, असा थेट इशारा कोळींनी शिंदे गटाला दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.