District Bank Election : भाजपच्या धूर्त खेळीतून जिल्हा बँकेत शिंदे गट; सहकारात वर्चस्व

Jalgaon District Bank
Jalgaon District Bankesakal
Updated on

जळगाव : ‘सहकार’क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे.

जिल्ह्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे वर्चस्व होते. मात्र शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनी प्रथम जिल्हा दूध संघात आणि आता जिल्हा बँकेत धूर्त खेळी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व एकनाथ खडसे यांच्या वर्चस्वाला हादरा दिला आहे. (Shiv Sena Shinde group and BJP have shaken supremacy of Ncp and Eknath Khadse by making cunning movein District Bank jalgaon news)

जिल्हा बँकेत संजय पवार यांचा विजय म्हणजे आगामी निवडणुकीसाठी ‘महाविकास’आघाडीच्या एकतेला हा ‘ईशारा’आहे. सहकार क्षेत्रात पक्ष नसतो असे म्हणतात, परंतु पक्षाशिवाय सहकार क्षेत्रही चालत नाही, असेही जाणकार सांगतात.

त्यामुळे नाही म्हटले तरी सहकार क्षेत्रात पक्ष असतोच. राष्ट्रवादी कॉंग्रेसने याच सहकाराच्या माध्यमातून आपल्या पक्षाची पाळेमुळे मजबूत केली आहेत. हेच ओळखून भाजपनेही त्याच मार्गाने पाऊल उचलले आहे. त्यामुळे त्यांनी सहकार क्षेत्राकडे लक्ष केंद्रीत केले आहे. जळगाव जिल्ह्यातही आता याची चुणूक दिसू लागली आहे.

भाजपने शिंदे गटाच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. आता त्याच शिंदे गटाच्या मदतीने ‘सहकार’क्षेत्रातही वर्चस्व निर्माण करण्यास प्रारंभ केला आहे. भाजपचे नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व शिदे गटाचे नेते व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा दूध संघात विजय मिळवित राष्ट्रवादी कॉंग्रेस व एकनाथ खडसे यांना हादरा दिला आहे. आता जिल्हा दूध संघातही त्यांनी हीच खेळी करीत चपराक दिली आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

Jalgaon District Bank
Tukaram Beej 2023 : तुकाराम महाराजांच्या जयघोषाने पाचोरा दुमदुमले

सत्ता उलथविण्यात सोबत

जिल्हा बँकेत भाजपचा संजय सावकारे यांच्या माध्यमातून एकमेव संचालक आहे. त्यामुळे आमचा जिल्हा बँक अधयक्षपद व उपाध्यक्षपद निवडणूकीत कोणताही हस्तक्षेप नाही, अशी घोषणा श्री. महाजन यांनी केली होती. प्रत्यक्षात मात्र याच एकमेव संचालकांचे मत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संजय पवार यांच्या पारड्यात टाकत, आम्ही सत्ता उलथविण्यात सोबत आहोत, अशी धूर्त खेळी केली.

तर, शिवसेना शिंदे गटाने आपले वर्चस्व दाखविण्यासाठी राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराला खुला पाठींबा देत, त्यांच्या मागे पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप आमदार मंगेश चव्हाण हे भक्कमपणे उभे राहिले आणि त्यानी पवारांच्या विजयात साथ दिली. त्यामुळे आज तरी जिल्हा बँकेवर शिंदे गट व भाजपचे वर्चस्व आहे, हे उघडपणे दिसून आले आहे. कारण उपाध्यक्षपदीही शिवसेना शिदे गटाचे अमोल चिमणराव पाटील हे आहेत.

पवारांचे डाव अन्‌ बेसावध ‘मविआ’

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय पवार यांनी जिल्हा बँक अध्यक्षपदाची संधी द्यावी यासाठी पक्षाकडे मागणी केली होती. अध्यक्षपदासाठी त्यांनी पक्षाच्या नेत्यांसह भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांच्याही भेटी घेतल्या होत्या. पक्षाने उमेदवारीच दिली नाही, तर प्रसंगी बंडखोरी करून निवडणूक लढविण्याचा त्यांचा निश्‍चय दिसून येत होता.

Jalgaon District Bank
Jalgaon News : शासकीय कर्मचारी 14 पासून संपावर; जिल्हाधिकारी कार्यालयात द्वारसभा

विशेष म्हणजे, उमेदवार निश्‍चीतीसाठी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीलाही श्री. पवार उपस्थित होते. त्यावेळीही त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. परिणामी बंडखोरी होणार हे आघाडीलाही माहित होते.

त्यामुळे त्यांच्या नेत्यांनी उमेदवारीबाबत संमजसपणे निर्णय घेतला असता, तर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस व पर्यायाने ‘महाविकास आघाडी’वर नामुष्कीची वेळ आलीच नसती. कल ओळखून त्यांनीच पवार यांचे नाव घोषित केले असते, तर महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून आले असते आणि भाजप व शिंदे गटालाही धक्का दिला गेला असता. परंतु, महाविकास आघाडीची बेसावध भूमिका या पराभवाला कारणीभूत ठरली आहे.

आगामी निवडणूकीत परिणाम

जिल्हा बँकेच्या निवडणूकीत आज शिवसेना शिंदे गट व भाजपने यश मिळविले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील मते फुटल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना ठाकरे गटात फारसे आलबेल नसल्याचे चित्रही समोर आले आहे.

Jalgaon District Bank
Jalgaon News : पारोळा मतदारसंघात 100 कोटींच्या कामांना मंजुरी; विकासकामांना येणार वेग

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी कॉंग्रेसची मते फुटल्याचा दावा केलेला असतानाच कॉंग्रेसचे सदस्य व जिल्हा बँक संचालक विनोद पाटील यांनी आमचे एकही मत फुटले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच फुट झाली आहे. त्यांनी आपल्या पक्षात पहावे, असा पलटवार केला आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीत पडलेली ही फुट आणि शिवसेना शिंदे गट व भाजपची युती आगामी निवडणूकीवर दूरगामी परिणाम करणारे ठरू शकतील. संजय पवार यांची अध्यक्षपदाची निवड पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्या मतदार संघात आगामी विधानसभा निवडणूकीत फायदेशीरही ठरू शकणार आहे.

Jalgaon District Bank
Jalgaon News : कोविड काळातील गुन्हे मागे घेणार? 77 प्रस्तावांवर चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()