BJP VS Shivsena Protest : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘कलंक’ असल्याचे म्हटले होते. त्यावरून राज्यभरात दोन्ही पक्षांत जोरदार घमासान सुरू आहे, त्याचे पडसाद जळगावातही उमटले. शिवसेनेच्या ठाकरे गटाने फडणवीस यांच्या प्रतिमेला, तर भाजपने उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन केले.
भाजपतर्फे टॉवर चौकात आंदोलन
भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरतर्फे टॉवर चौकात उद्धव ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पोस्टरवर शाही लावून व जोडे मारून निषेध करण्यात आला. (Shiv Sena Thackeray group and bjp staged Jode Maro movement against Fadnavis and Uddhav Thackeray image jalgaon news)
यापुढे त्यांनी पुन्हा असे व्यक्तव्य केले, तर ‘भाजयुमो’तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या वेळी दिला.
आंदोलनात भाजपचे जळगाव महानगरध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, माजी महापौर सीमा भोळे, भाजयुमोचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, उपाध्यक्ष सचिन बाविस्कर, सरचिटणीस अक्षय जेजूरकर, महिला आघाडच्या अध्यक्षा दीप्ती चिरमाडे, राहुल मिस्त्री, राहुल लोखंडे, स्वामी पोतदार, सागर जाधव, चिटणीस अश्विन सैंदाणे, रोहित सोनवणे, प्रसिद्धिप्रमुख गौरव पाटील, मंडलाध्यक्ष दिनेश पुरोहित, हर्शल चौधरी, समर्थ राणे, शक्ती महाजन, राजेंद्र मराठे, राहुल वाघ, अनिल जोशी, रेखा वर्मा, सरोज पाठक, नंदिनी दर्जी, संगीता पाटील, रेखा पाटील, आर्यन शेठ, मयूर राजपूत, हमीद शेख, अफसर शेख, सुभाष शौचे, हेमंत जोशी, जिभाऊ वानखेडे, जहाँगीर खान, राहुल पाटील, केदार देशपांडे व पदाधिकारी सहभागी झाले होते.
शिवसेनेर्फे मनपासमोर आंदोलन
शिवसेना ठाकरे गटातर्फे भाजपचा निषेध करण्यात आला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या सतरा मजली इमारतीसमोर देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. भाजप नेत्यांविरोधात घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनात विरोधी पक्षनेते सुनील महाजन, समन्वयक अंकुश कोळी, झाकिर पठाण, उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख उमेश पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, पिंटू सपकाळे, फरीद खान, शाकीर शेख, किरण भावसार, महिला आघाडी महानगरप्रमुख मनीषा पाटील, नीलू इंगळे, नीता संगोळे, युवासेना जिल्हाप्रमुख पीयूष गांधी, उपजिल्हा प्रमुख विशाल वाणी, महानगरप्रमुख यश सपकाळे, अमोल मोरे, महेश ठाकूर व शिवसैनिक सहभागी झाले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.