Jalgaon News : राष्ट्रपिता क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केवळ शाळा सुरू करून शिक्षणाचा प्रसार केला नाही तर बालहत्या प्रतिबंधगृह सुरू केले. (Shivshree Sonawane statement Krantisurya Krantijyoti True Bharat Ratna Winner jalgaon news)
छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली. पहिली शिवजयंती साजरी केली. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोगामी विचारांनी जनतेचे मस्तक सशक्त व जागृत करण्याचे महत् कार्य केले. ते खरे भारतरत्न पुरस्काराचे मानकरी असून, त्यांना या पुरस्काराने सन्मानित का केले जात नाही? असा प्रश्न शिवश्री संजय सोनवणे यांनी पाचोरा येथे व्याख्यानप्रसंगी उपस्थित केला.
महापुरुष सन्मान समिती व क्षत्रिय माळी समाज पंचमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवश्री संजय सोनवणे (पाटील) यांचे व्याख्यान झाले. वासुदेव महाजन अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले स्मारकासाठी उपोषण आंदोलन करणाऱ्या सुनील शिंदे, वासुदेव माळी, अशोक मोरे, किशोर डोंगरे, दीपक आदिवाल यांच्यासह महात्मा फुले स्मारकाचे बांधकाम करणारे ठेकेदार मयूर महाजन व सुनील महाजन यांचा सत्कार करण्यात आला. साहेबराव महाजन, संजय महाले, सुनील पाटील, खलील देशमुख, विलास पाटील यांनाही गौरविण्यात आले.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
याप्रसंगी विठ्ठल महाजन, ए. बी.अहिरे, आनंद नवगिरे, जिभाऊ शिंदे, पालिकेचे आरोग्य निरीक्षक तथा क्षत्रिय ग्रुपचे डी. एन पाटील, मुकेश तुपे, अनिल मराठे, आर. आर. सोनवणे, राजू पाटील, के. एस. महाजन, गोरख महाजन, नाना महाजन, शरद गीते आदी उपस्थित होते.
या वेळी संजय सोनवणे म्हणाले, की महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज, मोहम्मद पैगंबर यांचा पोवाडा लिहून तुकोबांच्या अभंगांचा अभ्यास करून संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा एकच असल्याचे प्रतिपादन केले. तरी सुध्दा फुले दापत्यांना भारतरत्न पुरस्कार मिळत नाही? अशी खंत व्यक्त केली. किशोर डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. विलास पाटील यांनी सूत्रसंचलन केले व आभार मानले. यशस्वितेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा परिवर्तन ग्रुपचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.