Jalgaon Municipality News : काव्यरत्नावली चौक येथील महापालिकेच्या युनिट कार्यालयाचे कर्मचारी शुक्रवारी (ता. १५) दुपारीच घरी निघून गेले.
आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी युनिटला अचानक भेट दिली त्या वेळी कार्यालयीन वेळेत कुलूप लावल्याचे आढळून आले. ()
या प्रकरणी तब्बल ३२ कर्मचाऱ्यांना ‘शो-कॉज’ नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिकेचे युनिट कार्यालय काव्यरत्नावली चौक येथे भाऊंच्या उद्यानाजवळ असून, त्या कार्यालयातून परिसरातील स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम व सफाई कामाचे नियोजन केले जाते. तसेच नागरिकांच्या तक्रारीही या ठिकाणी स्वीकारल्या जातात.
त्यामुळे या ठिकाणी कार्यालयीन वेळेसाठी शाखा अभियंत्यांसह कर्मचारी यांची नियुक्ती केलेली आहे. शुक्रवारी (ता. १५) महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी या युनिटची पाहणी केली त्या वेळी या कार्यालयात एकही कर्मचारी दिसून आला नाही. कार्यालयास चक्क कुलूप लावल्याचे दिसून आले.
कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई
कार्यालयीन वेळेत कार्यालयास कुलूप लावल्याचे आढळून आल्याने महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी कार्यालयातील शाखा अभियंत्यापासून तर शिपाई, अशा एकूण २३ कर्मचाऱ्यांना ‘शो-कॉज’ नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे, की काव्यरत्नावली येथील युनिटची पाहणी केली असता, युनिटप्रमुख, शाखा अभियंता व त्यांचे अधिनिस्त कोणतेही कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे आढळून आले.
कार्यालयास कुलूप लावल्याचे दिसून आले. संबंधित बाब ही बेजबाबदारपणाची असून, कार्यालयीन शिस्तीस धरून नाही. विभागातील सर्व कर्मचारी यांनी कर्तव्यात कसूर केलेला आहे. त्यामुळे आपल्यावर कलम ५६ नुसार शिस्तभंगाची कारवाई का करू नये, याबाबत लेखी खुलासा तीन दिवसांच्या आत सादर करावा. मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास आपले काहीही एक म्हणणे नाही, असे समजून आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
नोटीस बजावलेले कर्मचारी असे
प्रसाद पुराणिक, संजय दिनकर पाटील (शाखा अभियंता), नवीन पवार (मेकॅनिक), अशोक दौलत पाटील, विशाल चौधरी (शिपाई), सागर नन्नवरे (मुकादम), जगन्नाथ महाजन (फिटर), जयदेव रामदास चौधरी, रतीलाल सपकाळे (वॉचमन), संतोष पाटील, शांताराम नारखेडे, भगवान बाबूराव तायडे, गणेश निबा सोनार.
कपूरसिंग जाधव, गोपाल महाजन, विजय पाटील, हरी मते, गोकुळ तायडे, सुहास पाटील, अशोक मराठे, सुनील गवळी, प्रकाश पाटील, संदीप पाटील, शिवपाल सपकाळे, लक्ष्मण गवळी, कैलास सपकाळे, संजय सपकाळे (मजूर), राजेंद्र कोळी (वाहनचालक), बाजीराव बारसे, नबीताबाई कजंरभाट, उषाबाई अहिरे (कुली).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.