Jalgaon News : श्रीक्षेत्र पद्मालय देवस्थानाचे रुपडे पालटणार; गणेशभक्त सुखावले!

Shri Kshetra Padmalaya Temple
Shri Kshetra Padmalaya Templeesakal
Updated on

जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील श्री गणपती मंदिर देवस्थान, पद्मालय तीर्थस्थळांस ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत नुकतेच राज्य शासनाकडून ‘ब’ दर्जा प्राप्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मराठी नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी २३ मार्चला झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. (Shri Kshetra Padmalaya Temple will change its face B Class seats from Govt jalgaon news)

...अशी आहे महती

श्री गणपती मंदिर देवस्थान पद्मालय येथे एकाच व्यासपीठावर डाव्या आणि उजव्या सोंडेचे स्वयंभू दोन गणेशजी विराजमान आहेत. अमोद आणि प्रमोद असे त्यांना संबोधले जाते.

अडीच पिठांमधील अर्धेपीठ

पद्मालय मंदिर भारतातील अडीच गणपती पिठांमध्ये एक आहे. हे मंदिर अर्धेपीठ म्हणून सन्मानित आहे. मंदिरामध्ये स्वयंभू दोन गणेशमूर्ती आहेत. एकाच व्यासपीठावर उजव्या आणि डाव्या दोन्ही सोंडेची गणपती मूर्ती विराजमान असून, जगातील हे एकमेव असे मंदिर आहे. पद्मालय हा शब्द ‘पद्म’ आणि ‘आलय’ या दोन शब्दांचा मिलाफ आहे.

ज्या संस्कृतमध्ये कमळाचे घर, असा अर्थ आहे. या मंदिराच्या जवळील तलाव कायम कमळाच्या फुलांनी भरलेला असतो. त्यामुळे मंदिराला पद्मालय असे म्हटले जाते. येथील तलावात सप्तरंगी कमळ आहेत. हे मंदिर पुरातन असून, मंदिराच्या संपूर्ण बांधकामाची रचना हेमाडपंती आहे. मंदिरात एकाच व्यासपीठावर डाव्या- उजव्या सोंडेचे गणपती आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Shri Kshetra Padmalaya Temple
CM Eknath Shinde | मंदिरांच्या समस्यांबाबत लवकरच स्वतंत्र बैठक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जगात केवळ पद्मालय येथे ‘श्रीं’च्या दोन मूर्ती असल्याचे सांगितले जाते. या दोन्ही मूर्तींमध्ये प्रवाळ आहेत आणि त्यांच्या उजव्या कवटीचे त्रिशंकण उजवीकडे आहे आणि दुसरा एक डाव्या बाजूला आहे. दोन्ही मूर्ती स्वयंभू आहेत. हे मंदिर दगडांच्या आतील बाजूस बनले आहे. सद्‍गुरू गोविंदशास्त्री महाराज बर्वे यांना रिद्धी-सिद्धी प्राप्त झाली होती.

त्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला असून, गणेश पुराणात या गणपती मंदिराचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. काशी ईश्वेश्वर येथील शंकराच्या मंदिराच्या प्रतिकृतीप्रमाणे या मंदिराची निर्मिती असल्याचेही सांगण्यात येते. येथे ४४० कि.ग्रा. वजनाचा एक भला मोठा घंटा आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठे जाते आहे. याच परिसरात भीमकुंडही आहे.

श्रींची इच्छा अन् सर्वांचे प्रयत्न

देवस्थानास ‘ब’ दर्जा मिळावा, यासाठी सर्वपरीने प्रयत्न सुरू होते आणि त्यास अखेर यश येऊन ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे. याकामी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पंचायतराजमंत्री गिरीश महाजन, एरंडोल -पारोळा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यांचा ‘ब’ दर्जा प्राप्त होण्यास अत्यंत मोलाचा वाटा व सहभाग आहे. ‘ब’ दर्जा प्राप्त होण्यासाठी आवश्यक ती पूर्तता करण्यासाठी ग्रीन स्टोन इंजिनिअरिंगच्या आर. एस. महाजन यांनी परिश्रम घेतले आहे.

"अनेक वर्षांपासून श्रीक्षेत्र गणपती मंदिर देवस्थान पद्मालयला ‘ब’ दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर सर्वांच्या प्रयत्नांनी ‘ब’ दर्जा मिळाला आहे. लवकरच या परिसरात नियोजित असलेल्या कामांना वेग देऊन ती पूर्ण होतील व या ऐतिहासिक देवस्थानाचा विकास होऊन येणाऱ्या भारतवर्षात या देवस्थानास वेगळी झळाळी प्राप्त होईल." - अशोक जैन, अध्यक्ष, श्री गणपती मंदिर देवस्थान, पद्मालय

Shri Kshetra Padmalaya Temple
Police Recruitment : तीन आठवड्यांत नियुक्तिपत्र देऊन सुधारित यादी जाहीर करण्याचे निर्देश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.