Jalgaon News : महिला कुस्तीपटूंचा छळ करणारे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना अटक करावी, या मागणीसाठी कुस्तीपटूंनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जळगाव जिल्हा महिला असोसिएशनतर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. यानिमित्त महिला पहिलवानांच्या बाजूने जळगावातूनही आता आवाज बुलंद करण्यात आला. (Signature Campaign of District Women Association for demanding Arrest wrestlers harasser jalgaon news)
भारतीय कुस्तीचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी २१ एप्रिलला एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला, तसेच आणखी सात महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक न करता फक्त पीडितेला सुरक्षा पुरविण्यात आली.
राष्ट्रीय पातळीवर देशासाठी पदकांसाठी झळकविणाऱ्या खेळाडूंचे शोषण करणाऱ्या बृजभूषण सिंह याला अटक न करणे खेळाडूंसाठी अस्वस्थ करणारी बाब आहे. बृजभूषण सिंह यांना अटक होईपर्यंत कुस्तीपटूंनी सुरू ठेवलेल्या आंदोलनाला पाठिंबा व त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी जळगाव जिल्हा महिला असोसिएशनतर्फे समस्त जळगाव नागरिकांकडून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. दोन दिवस चालणाऱ्या या मोहिमेत जळगावातील अनेक महिला-तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
दोन दिवस मोहीम
गुरुवारी (ता. ४) दुपारी तीन ते सायंकाळी सातपर्यंत जी. एस. ग्राऊंडवर आणि शुक्रवारी (ता. ५) दुपारी तीन ते सायंकाळी सातपर्यंत काव्य रत्नावली चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. असोसिएशनच्या अध्यक्षा राजकुमारी बाल्दी, सचिव ज्योत्स्ना वहाटे, मीनाक्षी वाणी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे, मालती बेंडाळे, मंगला नगरकर, भारती पाथरकर, प्रचारप्रमुख वैशाली पाटील यांच्यासह जळगाव जिल्हा महिला असोसिएशनच्या पदाधिकारी यासाठी परिश्रम घेत आहेत.
घटनेचा निषेध
दिल्लीच्या जंतर-मंतर या अंदोलनस्थळावर गुरुवारी स्थानिक प्रशासनाने बळाचा वापर करून आंदेालकांना पुन्हा प्रताडीत करण्याचा प्रयत्न केला. त्याबाबतही महिला असोसिएशनने तीव्र शब्दांत सरकारचा निषेध नोंदविला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.