Jalgaon News : चोपडा तालुक्यात ऊस लागवड घटण्याची चिन्हे

Sugercane Crop News
Sugercane Crop Newsesakal
Updated on

गणपूर (ता. चोपडा) : चोपडा तालुक्यात गेली अनेक वर्षे ऊस लागवड होत असली, तरी या वर्षी ही लागवड घटण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंतचा विचार करता खोडवा आणि नवीन पूर्वहंगामी आणि सुरू लागवडीचे क्षेत्र अवघ्या काही एकरांवर स्थिरावल्याचे काही क्षेत्रात दिसून आले आहे.

चोपडा तालुक्यात आतापर्यंतचा विचार करता साडेतीन हजार ते दहा हजार हेक्टर क्षेत्र लागवडीच्या नोंदी आहेत. त्यात एक वर्ष सोडल्यास ऊस पूर्ण गळीतास गेल्याचे दिसून येते. सरासरी क्षेत्राचा विचार करता चार हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड होत आली आहे.

मात्र, या वर्षी आडसाली लागवड झाली नसल्यासारखी स्थिती असून, पूर्व हंगामी आणि सुरू हंगामातील लागवड सर्वच मंडल क्षेत्रात काही हेक्टर क्षेत्रापुरती सीमित आहे. (Signs of Decline in Sugarcane Cultivation in Chopda Taluka Jalgaon News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Sugercane Crop News
Jalgaon Crime News : New Yearची दुकानफोडी चोरट्याला पचलीच नाही

लागवड घटीची कारणे

या वर्षी कधी नव्हे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव झाल्याने एकरी सरासरी उत्पादन घटले. ठराविक क्षेत्र सोडल्यास तुटलेल्या ऊसातून एकरी १० ते २२ टन उत्पादन आले. ऊस लागवडीसाठी कार्यक्षेत्रात बैठका व प्रोत्साहन योजना नाही.

दोन हजारांच्या मागे पुढे असलेल्या भावामुळे वर्षभरात पन्नास हजाराचे उत्पन्न, त्यापेक्षा कापूस आणि रब्बीतील गहू, हरभरा, मका यातून वार्षिक लाखाच्या जवळपास उत्पनाचे अनुभव. गेल्या वर्षी ऊस तोडणीच्या खर्चाचे वाईट अनुभव, अशा अनेक कारणांमुळे ऊस लागवड घटण्याची शक्यता असून, या वर्षी तुटणाऱ्या ऊसापैकी ८० टक्के क्षेत्रातील पीक खोडवा, निडवा न राहता काढून टाकण्यात येत आहे. त्यासाठी नवीन ऊस बेणे पुरवठा, प्रोत्साहन योजना, अधिक भाव, अशा उपायांची गरज आहे.

Sugercane Crop News
Nashik News : उद्यान नागरिकांसाठी की गावगुंड, मद्यपींसाठी; वावरेनगरातील रहिवाशांचा संतप्त सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.