Jalgaon Municipality News : मनपा अधिकाऱ्यांचा ‘मूक मोर्चा’

महापालिकेचे अधिकारी व अभियंत्यांनी सोमवारी (ता.५) पोलिस अधिक्षक कार्यालयावर मूक मोर्चा काढला.
A silent march was held by engineers and officers on Monday at the District Superintendent of Police office
A silent march was held by engineers and officers on Monday at the District Superintendent of Police office esakal
Updated on

Jalgaon Municipality News : येथील महापालिकेचे अभियंता पुराणिक यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी त्वरित अटक करावी.

या मागणीसाठी महापालिकेचे अधिकारी व अभियंत्यांनी सोमवारी (ता.५) पोलिस अधिक्षक कार्यालयावर मूक मोर्चा काढला. तसेच मागणीचे निवेदन दिले. (Silent March of jalgaon municipal authorities news shm99)

शहरातील नूतन वर्षा कॉलनीत सुरू असलेले गटारीचे बांधकाम थांबविले, त्यानंतर महापालिकेच्या युनिट कार्यालयात जाऊन संशयित भूपेंद्र कुळकर्णी याने महापालिका अभियंता प्रसाद पुराणिक यांच्या कानशिलात लगावून शिवीगाळ केली होती.

या प्रकरणी अभियंता पुराणिक यांनी रामानंद पोलिस ठाण्यात कुळकर्णीविरोधात तक्रार दाखल केली होती.

याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. परंतु अद्याप संशयित कुळकर्णीवर कारवाई झाली नव्हती.

A silent march was held by engineers and officers on Monday at the District Superintendent of Police office
Jalgaon News : मराठा ओबीसी समाज बांधवांनी एकत्र राहणे गरजेचे : प्रवीण गायकवाड

त्यामुळे सोमवारी (ता.५) महापालिकेचे अधिकारी व अभियंते यांनी मूक मोर्चा काढला. यावेळी प्रथम जिल्हा पोलिस अधिक्षक व त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. भूपेंद्र कुळकर्णी यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली.

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील, अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत, उपायुक्त गणेश चाटे, सहाय्यक आयुक्त बाविस्कर, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, योगेश बोरोले तसेच इतर अधिकारी व अभियंता यावेळी उपस्थित होते.

जिल्हा पोलिस अधिक्षकांनी संबंधित आरोपीवर तातडीने कारवाईची ग्वाही दिल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांनी दिली.

A silent march was held by engineers and officers on Monday at the District Superintendent of Police office
Jalgaon News: भलेपणाच्या उपकाराचे कसे मानू आभार..? गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी प्रकट मुलाखतीत उलगडला जीवनप्रवास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.