Jalgaon Gold- Silver Rate : चांदीत 5 तर सोन्यात 1 हजाराची घसरण!

Silver And Gold Rate fell
Silver And Gold Rate fell esakal
Updated on

जळगाव : सध्याचा काळ हा सण-उत्सवांचा काळ आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला मुहूर्त दसरा ५ ऑक्टोबरला झाला. त्यादिवशी सोने ५१ हजार ८०० प्रतितोळा होते. आज तेच सोने ५० हजार ८०० प्रतितोळा झाले आहे. चांदीचा दर ६२ हजार प्रतिकिलो होता. आज चांदी ५७ हजारांपर्यंत खाली आहे. यामुळे अवघ्या दहा दिवसांत अनुक्रमे सोन्याच्या दरात एक हजाराची, तर चांदीच्या दरात पाच हजारांची घसरण झाली आहे. (Silver rate reduced by 5 thousand Gold Rate reduced by 1 thousand in Jalgaon Latest Jalgaon News)

आषाढी एकादशीनंतर लग्नसराई बंद झाल्याने सोने-चांदीला हौसेखातर घेणाऱ्या व्यतिरिक्त मागणी नव्हती. यामुळे सोने-चांदीच्या बाजारात शांतता होती. गणेशोत्सवानंतर सोने बाजार झळाळू लागला. कमी-अधिक प्रमाणात दरात वाढ, घट होत होती. चांदी ५४ हजारांपर्यंत खाली आली होती. सोने पन्नास हजारांपर्यंत खाली आले होते.

मात्र नवरात्रोत्सवात सोने बाजाराने जी घसरण घेतली ती विजयादशमीपर्यंत व नंतरचे काही दिवस कायम होती. आत तब्बल दहा दिवसांनी सोने ५० हजार आठशे रुपये प्रतितोळा आहे. चांदी ५७ हजारांवर आहे. सोन्या-चांदीतील गुंतवणूकदारांना ही गुंतवणुकीची संधी असल्याचे अभ्यासक सांगतात.

Silver And Gold Rate fell
Nashik Crime News : सिन्नरला दिवसाढवळ्या 3 ठिकाणी घरफोड्या

सोने-चांदीचे दर असे (जीएसटी विना)

तारीख--सोने (प्रतितोळे)--चांदी (प्रतिकिलो)

५ ऑक्टोबर-- ५१ हजार ८००--६२ हजार

६ ऑक्टोबर--५२ हजार --५०९ हजार

११ ऑक्टोबर--५१ हजार--५९ हजार

१४ ऑक्टोबर--५१ हजार --५८ हजार

१६ ऑक्टोबर---५० हजार ६००--५६ हजार

१७ ऑक्टोबर--५० हजार ८००--५७ हजार

Silver And Gold Rate fell
Nashik : अबब! शंकराच्या मूर्तीवर अवतरले चक्क नागराज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.