Hatnur Dam : हतनूर धरणात गाळाचे साम्राज्य; क्षमतेच्या 50 टक्के गाळ

Hatnur Dam
Hatnur Damesakal
Updated on

भडगाव : एकीकडे तापी आणि गिरणा धरणांवरील प्रकल्प निधीअभावी रखडल्याने पावसाळ्यात पाणी वाहून जाते, तर दुसरीकडे जे मोठे प्रकल्प आहेत तेच गाळात अडकल्याचे चित्र आहे. त्यामुळे आहे त्या प्रकल्पातही पूर्ण क्षमेतेने पाणी अडविले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. ‘हतनूर’मध्ये क्षमतेच्या ५० टक्के, तर गिरणा प्रकल्पात सात टक्के एवढा गाळ साचलेला आहे. त्यामुळे वाया जाणारे पाणी अडविण्याचे दूरच; परंतु साचलेल्या गाळाचा उपसा केव्हा होईल, हा खरा प्रश्न आहे.

Hatnur Dam
Jalgaon Agriculture News : शेतीच्या मशागतीला ‘अवजार बँके’चा बूस्टर

जिल्ह्यातून तापी आणि गिरणा या दोन प्रमुख नद्या वाहतात. या नद्यांवरच जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. मात्र प्रमुख नद्यांवर २५-३० वर्षांपासून मंजूर प्रकल्प निधीअभावी प्रलंबित आहेत. त्यामुळे दर वर्षी पावसाळ्यात पाणी वाया जाते. पण दुसरीकडे ज्या प्रकल्पात पाणी अडविले जाते, तेही गाळात अडकले असल्याचे आकडेवारी सांगते. त्यामुळे पाणी असूनही धरण पूर्ण क्षमेतेने भरत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

‘हतनूर’मध्ये ५० टक्के गाळ

हतनूर धरणाची एकूण क्षमता ३८८ दलघमी एवढी आहे. यंदा धरणातून तब्बल दहा हजार ९५ दलघमी एवढे पाणी ‘ओव्हरफ्लो’ झाले. तर धरणात सद्यःस्थितीत क्षमतेच्या पन्नास टक्क्यांपेक्षाही अधिक गाळ असल्याचे चित्र आहे. त्यामुळे धरण शंभर टक्के भरले असतानाही प्रत्यक्षात धरणात फक्त ५० टक्केच पाणीसाठा असतो. उर्वरित ५० टक्के साठा हा गाळात असतो. त्यामुळे मुबलक पाणी असूनही आपण पाणी अडवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

Hatnur Dam
Maharashtra Politics: ‘जास्त बोलू नको, औकातीत राहा’ ठाकरे गटाचा खासदार अन् भाजप आमदार भिडले

‘गिरणा’त सात टक्के गाळ

गिरणा धरणात हतनूर इतका नाही, पण त्या खालोखाल गाळ असल्याचे दिसते. गिरणा धरणाच्या प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सद्यःस्थितीत धरणात सात टक्के एवढा गाळ आहे. त्यामुळे मृतसाठा हा पूर्णतः गाळात अडकला आहे. २०१६ मध्ये तर दुष्काळसदृश परिस्थितीत मृत साठ्यातून पाणी उपसण्याची वेळ आली होती. तेव्हा अक्षरशः गाळात पाणी साचलले होते. त्यामुळे धरणाची साठवण क्षमतेवर त्याचा परिणाम पाहावयास मिळतो.

गाळ केव्हा उपसला जाईल?

एकीकडे निधीअभावी तापी आणि गिरणा नदीवर प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे पाणी अडविले जात नाही. पण दुसरीकडे गाळाअभावी प्रकल्पात पूर्ण क्षमेतेने पाणी साठवता येत नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पात वर्षानुवर्षे साचलेल्या गाळाचा उपसा केव्हा होईल, असा प्रश्न आता विचारला जात आहे. प्रकल्पासाठी मोठा निधी लागणार आहे. पण थोड्याफार निधीवर गाळाचा उपसा होऊन धरणाची साठवण क्षमता वाढणार आहे. ते विचारात घेऊन किमान शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Hatnur Dam
Jalgaon Politics : आयुक्तांच्या बदलीमागे राजकीय खेळी?

''धरणात एवढ्या मोठ्या प्रमाणात गाळ असणे चुकीचे आहे. वेळोवेळी गाळाचा उपसा होणे गरजेचे आहे. गाळामुळे धरणाच्या साठवण क्षमतेवर परिणाम होतो, ही वास्तवता आहे. शासनाने गाळ उपसण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रकल्पावर टेक्नॉलॉजीयुक्त डॅम मॉनिटरिंग सिस्टिम राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे गाळ साचून राहणार नाही.'' - संजय पावडे, जलश्री संस्था

वस्तुस्थिती

हतनूर प्रकल्प क्षमता ... ३८८ दलघमी

गिरणा प्रकल्प क्षमता ... ६०८ दलघमी

हतनूर प्रकल्पात गाळ ... ५० टक्के

गिरणा प्रकल्प गाळ ... ०७ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.