Jalgaon Crime : सिव्हीलपासून जेलपर्यंत चपलेतून गांजा तस्करी! जेलच्या गेटवर तपासणीत आढळला गांजा

Jalgaon Crime : सिव्हीलपासून जेलपर्यंत चपलेतून गांजा तस्करी! जेलच्या गेटवर तपासणीत आढळला गांजा
Updated on

Jalgaon Crime : जिल्हा कारागृहात न्यायबंदी असलेल्या कैद्याला उपचारार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (सिव्हिल) दाखल करण्यात आले होते. उपचार पुर्ण झाल्यावर डिस्चार्ज होवुन त्याची परत कारागृहात रवानगी करण्यात आली. (Smuggling drug in Shoes from Civil hospital to Prison jalgaon crime news)

त्यावेळी जेलच्या गेटवर अंगझडतीत काही आढळले नाही. मात्र, चपलेवर नजर गेल्यानंतर या भामट्याने चप्पलमध्ये गांजा लपवुन आणल्याचे आढळले.

या प्रकरणी जेल पोलिसांच्या तक्रारी वरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विठ्ठल उर्फ माऊली तुकाराम हटकर असे या कैद्याचे नाव आहे. न्यायालयीन बंदी म्हणून कारागृहात असलेल्या हटकरला प्रकृती अस्वास्थामुळे कारागृह प्रशासनाने गेल्या बुधवारी (ता. १६) सिव्हीलमध्ये दाखल केले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Crime : सिव्हीलपासून जेलपर्यंत चपलेतून गांजा तस्करी! जेलच्या गेटवर तपासणीत आढळला गांजा
Jalgaon Crime News : राज्य उत्पादन शुल्क, पोलिसांचे गावठी दारूविरोधात धाडसत्र; 2 दिवसांत 105 गुन्हे दाखल

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला कारागृहात परत नेण्यात आले. त्यावेळी जेलच्या गेटवर त्याची अंगझडती घेण्यात आली. दरम्यान, जेल हवालदार सुरेश लक्ष्मण बडगुजर यांची नजर त्याच्या पायावर गेली असता, विठ्ठलने घातलेल्या चप्पलमध्ये आठ ग्रॅम गांजा लपवुन आणल्याचे आढळले. हवालदार बडगुजर यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख तपास करीत आहेत.

दरम्यान, जिल्‍हा रुग्णालयात असतांना त्याला गांजा कोणी आणून दिला? तसेच, पोलिस सुरक्षेत कैद्यांना अमली पदार्थाचा पुरवठा करणारा कोण? याचा पोलिस तपास करत आहेत.

Jalgaon Crime : सिव्हीलपासून जेलपर्यंत चपलेतून गांजा तस्करी! जेलच्या गेटवर तपासणीत आढळला गांजा
Jalgaon Crime News : गोजरे येथील चोरीचा उलगडा; 10 लाख 94 हजाराचा मुद्देमाल जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.