Jalgaon News : परराज्यातून जळगावमार्गे औरंगाबादला गुटख्याची तस्करी

Jalgaon Crime News
Jalgaon Crime Newsesakal
Updated on

Jalgaon Crime News: औरंगाबाद पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी २५ लाखांचा गुटखा जप्त केला होता. याप्रकरणी ट्रकमालक-चालकांसह चौघांना ताब्यात घेतले, तर जळगावचे दोघे भामटे पळून गेले होते. या दोन्ही भामट्यांना जळगाव गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्या अटकेतून जळगावमार्गे औरंगाबाद-पुण्याकडे होणारा गुटखा तस्करीचा व्यवसाय परत एकदा उजेडात आला आहे.

१७ ऑक्टोबर २०२० च्या पहाटे जळगावकडून येणारा ट्रक (एमएच १९, झेड ४६५७) गुटख्याची मोठी खेप घेऊन येत असल्याची माहिती सिडको पोलिस ठाण्‍याचे सहाय्यक निरीक्षक वामन बेले यांना मिळाली. त्यावरून त्यांच्या पथकाने सिडको परिसरात सापळा रचला.

(Smuggling of Drugs from foreign state to Aurangabad via Jalgaon Four and a half crores worth of freight per week Jalgaon Crime News)

Jalgaon Crime News
Nashik News : नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

तेथे वाहनांची पथकाने तपासणी केली असता, जळगावमार्गे आलेल्या ट्रकमधून गुटख्याचा मोठा साठा मिळून आला.

पोलिसांनी घटनास्थळावरूनच शीतल बाबूलाल बोहरा (३९, रा. सिंधी कॉलनी), शेख हबीब शेख मदन (३६, रा. मुकुंदवाडी), शेख रियाज फत्तू शेख (२५, रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी) आणि सुभाष ओंकार जगताप (६५, रा. दौलतनगर, जळगाव) यांना अटक केली होती, तर या चौघांचे प्रमुख साथीदार पोलिसांच्या हाती तुरी देत फरारी झाले होते. तेव्हापासून त्यांचा कसून शोध सुरू होता.

जळगाव एलसीबीने केली अटक

फरारी संशयितांबाबत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशनराव नजन पाटील यांना माहिती मिळाली.

त्यावरून त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक गणेश चोभे, विजय पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, महेश महाजन, विजय पाटील, परेश महाजन यांनी जळगाव शहरातील प्रजापतनगरात सापळा रचून अजय लीलाधर गोसावी व त्याचा साथीदार मनोज ऊर्फ मयूर शालिक चौधरी (रा. तुकारामवाडी) यांना अटक केली.

संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, दोघांना औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

Jalgaon Crime News
Nashik Rain Update : ढगाळ वातावरणाने नाशिककर धास्तावले; बळीराजाला करपा रोगाची धास्ती

जळगाव तस्करीचे हब

जिल्‍ह्याला एका बाजूने मध्य प्रदेश दुसऱ्या बाजूने मराठवाडा, तर तिसऱ्या बाजूने गुजरात राज्याची जवळची सीमा लागून आहे. परिणामी, चारही दिशेतून गैरमार्गाने येणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांसाठी जळगाव महत्त्वाचे हब बनले आहे. जळगाव जिल्‍ह्यात मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांतून गुटख्याची बेसुमार आवक होत असते.

चाळीसगाव तालुक्यात दर एक दिवसाआड दीड कोटींच्या गुटख्याची आवक होऊन तो परस्पर रवाना होतो.

मध्य प्रदेशातून आलेला गुटखा बुलडाणा- मुक्ताईनगरकडून जळगावमार्गे औरंगाबादसह मराठवाड्यात आणि पुण्याच्या दिशेने पाठविला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. गुटख्याचा उद्योग वाळूपेक्षाही चौपट असून, जळगावातूनच त्याची तस्करी होत असल्याची माहिती समोर आली आहे.

Jalgaon Crime News
Solapur News: महापालिकेचा अजब कारभार! आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पार्क मैदानावर ५ हजारांसाठी टेनिस बॉल सामन्यांना परवानगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.