Rain Snake Bite Precaution : आला पावसाळा, सर्पांपासून सांभाळा! प्रशिक्षित सर्पमित्रांनाच बोलवा

पावसामुळे वारूळं, बिळे पाण्याखाली आल्याने अनेक सापांचा अधिवास नष्ट होतो.
Snake Bite Precaution
Snake Bite Precaution esakal
Updated on

Rain Snake Bite Precaution : जूनपासून पावसाळा सुरू झाला आहे. मात्र अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. काही प्रमाणात पावसाने शहरासह जिल्ह्यात हजेरी लावली आहे.

पावसामुळे वारूळं, बिळे पाण्याखाली आल्याने अनेक सापांचा अधिवास नष्ट होतो. यामुळे नागरिकांनी घरात साप येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, साप आढळला तरी घाबरून न जाता प्रशिक्षित सर्पमित्राला बोलवा, असा सल्ला वन्यजीव सरंक्षण संस्थेने नागरिकांना दिला आहे. (snake bite precautions due to rain jalgaon news)

पावसाळा सुरू होताच शेतकरी शेतीच्या कामांना सुरवात करतात. अडगळीत पडलेल्या वस्तू बाहेर काढल्या जातात. जनावरांचे गोठे साफ होतात. जळाऊ सरपण काढले जाते. त्याखाली आसरा शोधत आलेले साप नागरिकांच्या दृष्टीस पडतात. साप बाहेर पडायला लागले तसे काही नागरिक साप मारण्यात धन्यता मानतात.

बरेचसे नागरिक सर्पमित्रांना बोलावतात. नागरिकांनी साप वाचविण्यासाठी सर्पमित्राला बोलावताना जास्त घाई करू नये. सापाला पकडण्याची खरंच गरज आहे का, याचा विचार करूनच सर्पमित्रांना पाचारण करावे. सध्या सापांपेक्षा सर्पमित्रच जास्त झाले आहेत. यात काही प्रामाणिक प्रशिक्षित सर्पमित्र असतात, तर काही शिकाऊ, अर्धवट ज्ञान असलेले यू-ट्यूबर स्नेक कॅचर.

अर्धवट ज्ञान असणारे सर्पमिक्ष साप पकडताना निष्काळजीपणा करतात. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने विषारी साप बॅगइन करताना सर्पदंश होऊ शकतो. कारण पुरेसे ज्ञान नसलेला स्नेक कॅचर कोणतीही खबरदारी घेत नाही. त्याच्याकडे सुरक्षित साधने नसतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिचित, विश्वासू सर्पमित्रांनाच बोलवावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Snake Bite Precaution
Snake Farming : इथं शेतकरी करतात सापाची लागवड; वर्षाला कमवतात बक्कळ पैसे!

साप घरात येऊ नये, यासाठी...

*परिसर स्वच्छ ठेवा, अडगळ काढून टाका.

*अनावश्यक झुडपे, वेली काढून टाका किंवा त्यांची छाटणी करा.

*उष्टी, खरकटी परिसरात टाकू नका. त्यामुळे उंदीर येणार नाहीत.

*ड्रेनेज पाइपाच्या गटाराकडील बाजूला जाळी बसवा.

*जेणेकरून त्याद्वारे साप घरात येणार नाहीत.

*खळ्यात, गोठ्यात, शेतात वावरताना लांब काठी वापरा.

*कडबा, चाऱ्यात एकदम हात घालू नका.

Snake Bite Precaution
Robot Snake : शनीच्या चंद्राचे विश्‍लेषण करणार ‘रोबोटिक साप’

*गोवऱ्या, लाकडे काढताना सावधानता बाळगा.

*अंगण, घरातील बिळे दरवाजांच्या चौकटीतील फटी बुजवून टाका.

*मण्यारसारखे विषारी साप निशाचर असतात.

*रात्री जमिनीवर झोपणे टाळा.

*रात्री बाहेर, शेतात जाताना बॅटरी, पायात बूट घाला.

साप बदला घेत नाही

साप कधीही तुम्हाला स्वतःहून पुढे येऊन चावत नाही. साप डूख धरत नाही. सापाला आपल्यासारखी तीक्ष्ण दृष्टी नसते. त्याला हात, पाय, बाह्यकानही नसतात. कुणाचा चेहरा लक्षात राहील इतका त्याचा मेंदू तल्लख नसतो, त्यामुळे कोणताच साप बदला घेत नाही.

"साप चावला म्हणजे मृत्यू नाही. प्रत्येक साप हा विषारी नसतो. विषारी सर्पदंश झाला, तरी योग्य वेळेत योग्य वैद्यकीय उपचार केले, तर रुग्ण शंभर टक्के वाचतो." -बाळकृष्ण देवरे, संस्थापक, वन्यजीव संरक्षण संस्था

Snake Bite Precaution
Snake Bite : साप चावला बायकोला, अन्‌ विष चढले नवऱ्याला; ‘तो’ म्हणतो मला नाहीच झाला सर्पदंश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.