Jalgaon News : वाळू डंपरच्या अपघातात (ता. २७) शनिवारी जखमी झालेल्या आमदार लता सोनवणे यांच्यासह प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची रविवारी (ता. २८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारपूस केली.
शनिवारी रात्री चोपड्याहूत परतत असताना, वाळूच्या डंपरने आमदारांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात गाडीचे खूप नुकसान झाले आणि ही बातमी राज्यभर पसरली. (Sonavane from Chief Minister Inquiring about couples health Jalgaon News)
मुख्यमंत्री शिंदे, मंत्री शंभुराजे देसाई यांच्यासह सर्व शिवसेना नेते आमदारांनी सगळ्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
या अपघातानंतर आमदार लता सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, वाहनचालक व सुरक्षारक्षकांना अॅर्किड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
डॉ. परेश दोशी व त्यांच्या टीमने अनेक चाचण्या, तपासणी व औषधोपचार करून त्यांना पुढील दोन दिवस संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनीही त्यांची विचारपूस केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.