Jalgaon Agricultural Update : पावसाच्या भरवशावर जिल्ह्यात पेरण्यांना सुरवात; जमिनीत केवळ 3 इंच ओल

Monsoon Update : जूनच्या पहिल्या आठवड्यातच दर वर्षी चांगला पाऊस येतो. यंदा मात्र पावसाने जूनमध्ये तब्बल २६ दिवस उशिराने हजेरी लावली, तेही तुरळक स्वरूपात
Agriculture News
Agriculture Newsesakal
Updated on

Jalgaon News : जून महिला संपला, तरी अद्याप पेरण्यायोग्य पाऊस झालेला नाही. जून महिन्यात केवळ सहा दिवस पाऊस झाला, तोही ३६ टक्के. यामुळे जमिनीत केवळ तीन इंच ओली झाली आहे.

किमान सहा इंच जमीन ओली झाली पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांनी आता पावसाच्या भरवशावर पेरण्यांना सुरवात केल्याचे चित्र शुक्रवारी (ता. ३०) पाहावयास मिळाले.(Sowing started in district depending on rain Only three inches wet in the soil arable farmers still have their eyes on sky jalgaon news)

जूनच्या पहिल्या आठवड्यातच दर वर्षी चांगला पाऊस येतो. यंदा मात्र पावसाने जूनमध्ये तब्बल २६ दिवस उशिराने हजेरी लावली, तेही तुरळक स्वरूपात. काही भागात जोरदार, तर काही ठिकाणी अत्यल्प पाऊस झाला. अद्याप जोरदार, पेरण्यायोग्य पाऊस झालेला नाही. चांगला पाऊस झाला, की पेरण्या करू, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

पुणे, मुंबई, नाशिकला दमदार पाऊस हजेरी लावत आहे. जळगाव जिल्ह्यात दमदार नाही. मात्र, पेरणीचे दिवस कमी होत असल्याने शुक्रवारपासून जिरायतदार शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या सुरू केल्या. इतर ठिकाणी पाऊस पडतो. आपल्याकडेही पाऊस पडेलच, अशी आशा त्यांना आहे.

उडीद, मूग पेरता येणार नाही

आता उडीद, मुगाच्या पेरण्या करता येणार नाहीत. कारण ही पिके जेव्हा परिपक्व होतील तेव्हा पावसाचा वेग वाढला तरी पिके वाया जातील.

१५ जुलैपर्यंत पेरण्या करता येतील

उडीद, मूग वगळता कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तूर या पिकांच्या पेरण्या १५ जुलैपर्यंत करता येतील. आता मात्र पावसाने वेग घेतला पाहिजे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Agriculture News
Jalgaon Crime News : जिल्ह्यातील दोघांवर MPDAची कारवाई

बागायती ७० हजार हेक्टर

बागायतदार शेतकऱ्यांनी आतापर्यंत ७० ते ८० हजार हेक्टरवर पेरण्या केल्या आहेत. ज्यांच्याकडे पाणी आहे ते पेरण्या करू शकतात. मात्र, ज्यांच्या शेतात पाणी नाही, त्यांना पावसावर अवलंबून राहावे लागणार आहे.

यंदाचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र असे

पिके -- पेरणी क्षेत्र (हेक्टर)

कापूस -- पाच लाख ५० हजार

ज्वारी -- १९ हजार ३००

मका -- ९८ हजार ५००

इतर तृणधान्य -- दोन हजार

तूर -- नऊ हजार ४००

मूग -- नऊ हजार

उडीद -- ११ हजार ५००

भुईमूग -- दोन हजार

तीळ -- एक हजार

सूर्यफूल -- ५००

सोयाबीन -- २० हजार

एकूण खरीप -- सात लाख ६३ हजार २००

Agriculture News
Pune News : पुणे जिल्ह्याला ‘मुद्रांक’चे मिळाले ३८ कोटींचे अनुदान

"पावसाने दडी मारली असली तरी काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या सुरू केल्या आहेत. आता उडीद, मूग ही पिके घेता येणार नाहीत. इतर पिके पावसाचा अंदाज घेऊन घ्यावीत."

-संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

पिकपेऱ्याबाबत मार्गदर्शन

आतापर्यंत झालेल्या पावसाने जमिनीत सध्या तीन इंचांची ओल आहे. किमान सहा इंच तरी ओल जमिनीत झाली पाहिजे.

पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावीत, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. उडीद, मुगाचा पेरा आता करता येणार नाही. मात्र, इतर पिके घेता येतील, अशी माहिती महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राच्या विषय विशेषतज्ज्ञ डॉ. स्वाती निकम यांनी ‘सकाळ’ला दिली.

Agriculture News
Solapur News : सोलापूरला साकारणार ‘आयटी पार्क’; ‘आर्यन’ची ८०० कोटींची गुंतवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()