Sparrow Count Activity : निसर्गमित्रतर्फे 3 दिवसीय चिमणी गणना उपक्रम; 'या' तारखांना मोहीम

sparrow count activity 3 day Maharashtra wide online  will be conducted from March 18 to 20 jalgaon news
sparrow count activity 3 day Maharashtra wide online will be conducted from March 18 to 20 jalgaon newsesakal
Updated on

जळगाव : जागतिक चिमणी दिनानिमित्त निसर्गमित्रतर्फे १८ ते २० मार्च हा तीनदिवसीय महाराष्ट्रव्यापी ऑनलाइन चिमणी गणना उपक्रम (Sparrow Count Activity) राबविण्यात येणार आहे. (sparrow count activity 3 day Maharashtra wide online will be conducted from March 18 to 20 jalgaon news)

२० मार्चला चिमणी दिन साजरा होतो. त्यानिमित्त हा उपक्रम होणार आहे. राज्यात १८ ते २० मार्चदरम्यानच्या तीन दिवसांतील कोणताही एक दिवस निवडून किमान १५ मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ चिमणी गणना करावी. ही गणना सकाळी साडेसहा ते साडेनऊ अथवा दुपारी साडेचार ते साडेसहा या वेळात करावी, असे आवाहन पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी केले आहे.

चिमणी संवर्धन, जतन व जनजागृतीसाठी चिमणी गणना घेण्यात आली आहे. नागरिकांनी चिमणी गणनेची लिंक सर्वत्र पाठवावी व चिमणी वाचवा मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चिमणी गणनेत सहभाग घेणाऱ्या व्यक्तीला सहभागाचे प्रमाणपत्र त्यांच्या व्हॉट्‌सॲपवर पाठविले जाणार आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

sparrow count activity 3 day Maharashtra wide online  will be conducted from March 18 to 20 jalgaon news
Jalgaon News : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी 510 कोटींच्या तरतुदीला शासनाची मान्यता

चिमणी गणना गल्ली, कॉलनी, बाग, कार्यालयाच्या परिसरात, संकुलात करता येईल, असे राजेंद्र गाडगीळ यांनी कळविले आहे. महाराष्ट्रव्यापी ऑनलाइन चिमणी गणना फॉर्मची लिंक ज्यांना हवी आहे, त्यांनी ८९९९८०९४१६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. तसेच गणनेसाठी https://forms.gle/k2S8KawpHwhMH2JA6 ही लिंक वापरावी.

sparrow count activity 3 day Maharashtra wide online  will be conducted from March 18 to 20 jalgaon news
Jalgaon Political : खडसेंवर ‘मात’ करण्याचा अजेंडा अन्‌ मतदारसंघाची सुरक्षा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.