Jalgaon Ramdan 2023 : ‘शब-ए-कद्र’ची संपूर्ण रात्र प्रार्थना; रात्री दुवाँ

Nashik Ramdan Eid 2023 News
Nashik Ramdan Eid 2023 Newsesakal
Updated on

Jalgaon News : शहरातील विविध मशिदींमध्ये मंगळवारी (ता. १८) ‘शब-ए-कद्र’ची विशेष नमाज आणि अखंड प्रार्थना करण्यात आली. पवित्र रमजान महिन्याच्या २६ व्या रोजाच्या रात्री शब-ए-कद्रची विशेष रात्र असते. (special Namaz and continuous prayer of Shab e Qadr was offered on 18 april jalgaon news)

शहरातील मुस्लिम बांधवांनी मशिदीत नमाज अदा करून मोठ्या संख्येने रात्री इदगाह कब्रस्तानात दुवॉं केली. सकाळी दिवसभर कब्रस्तानात स्वतः कबरींची रंगरंगोटी करून रात्री विशेष प्रार्थना केली.

इस्लामधर्मीय अनुयायींमध्ये रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रमजान महिना तीन खंडात विभागला असून, तिसरा खंड अर्थात शेवटच्या दहा दिवसांना धार्मिकदृष्ट्या प्रचंड महत्त्व आहे. या दिवसांतील दहा रात्रींना ‘ताक राते’, असेही संबोधले आहे.

आपल्याकडून झालेल्या चुका, धर्माचरणातील खंड किंवा कुठल्याही सजीवाचे मन दुखवले, त्रास दिला असल्यास किंवा शरीरास नुकसान पोचविले असल्यास, कुणाचा अपप्रचार, अशा कृत्याला इस्लाम धर्मीयात गुन्हा संबोधले आहे. अशा गुन्ह्यांसाठी माफी मागण्याची रात्र म्हणजेज ‘शब-ए-कद्र’.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Nashik Ramdan Eid 2023 News
Jalgaon ZP News : जिल्हा परिषदेत सहाशेवर रिक्त पदे भरणार

दिवसभर कब्रस्तानात सेवा

इदगाह कब्रस्तानात आप्तेष्टांच्या कबरचा परिसर स्वच्छ करून कच्च्या कबरींना व्यवस्थित करून विटांना चुन्याने रंगविण्यात येते. कबरीवर पाणी टाकून जमिनीतील जीवजंतुसाठी खाद्यही (साखर) टाकले जाते. काही मुस्लिम तरुण दर आठवड्याला कब्रस्तानात येऊन स्वेच्छेने ही सेवा करतात. मात्र, रमजान महिन्यात प्रत्येक व्यक्ती किमान आपल्या आत्पेष्टांसाठी कब्रस्तानात येऊन सेवा देतो.

रात्रभर प्रार्थना आणि दुवाँ

शहरातील सर्वच मशिदींमध्ये शब-ए-कद्रसाठी रात्रभर नजाम अदा करण्यात आली. बहुतांश रोजेदार दहा दिवसांठी मशिदींमध्ये वास्तव्याला राहतात. त्याला ‘एैतेकाब’, असे संबोधले जाते. ही मंडळी दहा दिवस अखंडपणे प्रार्थना, नमाज-कुराण पठण करतात. दहा दिवसांनंतर चाँद रातीला ही मंडळी रात्री आपआपल्या घरी परतते. सकाळी अंघोळ करून नवे कपडे परिधान करत अत्तर लावून गोरगरीबांना दान देत ईदच्या नमाजसाठी रवाना होतात.

इदगाह-कब्रस्तानात गर्दी

नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव रात्री अकराच्या सुमारास कब्रस्तानात पोचले. आप्तेष्टांच्या कबरीवर अगरबत्ती, सुगंध लावून लोबान प्रज्वलित करून फातेहा पठण झाले. कबरींवर सुगंधी फुले वाहून कुरान शरीफच्या पंक्ती वाचून दुवाँ करण्यात आली.

Nashik Ramdan Eid 2023 News
Jalgaon Market Committee Election : लढतींचे चित्र आज स्षष्ट होणार; अर्ज माघारीचा शेवटचा दिवस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.