Spotted Barb : वाघूर धरणात आढळेल्या या माशाने महाराष्ट्रातील मत्स्य सूचित पडली भर

Spotted Barb fish
Spotted Barb fishesakal
Updated on

जळगाव : वाघूर धरणात ‘स्पॉटेडसेल बार्ब’ मासा असल्याचा शोध येथील वन्यजीव सरंक्षण संस्थेच्या मत्स्य अभ्यासकांनी लावला आहे. गेल्या १४ वर्षांपासून संस्थेचे मत्स्य अभ्यासक गौरव शिंदे, बाळकृष्ण देवरे, कल्पेश तायडे यांनी ‘शोध गोड्या पाण्यातील माश्यांचा’ या मोहिमेद्वारे ३४ पेक्षा जास्त प्रजातींची नोंद घेतली आहे. यंदा महाराष्ट्रासाठी नवीन असलेल्या ‘स्पॉटेडसेल बार्ब’ या माशाचा शोध लावण्यात यश आले आहे. या नोंदीमुळे महाराष्ट्रातील गोड्या पाण्यातील मत्स्य सूचित अजून एक माशाची भर पडली आहे.

Spotted Barb fish
Mumbai : भावा तू यूपीएससी कर! मुंबईच्या रिक्षावाल्याचं जनरल नॉलेज बघून चक्कर येईल

वन्यजीव संरक्षण संस्था राज्यातील जैविक विविधतेच्या संशोधन, संरक्षण आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या अभ्यासकांचे पक्षी, वनस्पती, कीटक, सरीसृप, उभयचर, फुलपाखरू, पतंग अशा अनेक प्रजातींवर शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. संशोधन कार्यात वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, अभ्यासक राहुल सोनवणे, रवींद्र सोनवणे, योगेश गालफाडे, प्रसाद सोनवणे, स्कायलेब डिसूझा, सतीश कांबळे, जयेश पाटील, अमन गुजर, प्रदीप शेळके, वासुदेव वाढे, जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, नीलेश ढाके यांनी सहकार्य केले. संशोधक बी. विजयकृष्णन, डॉ. वरद गिरी यांनी मार्गदर्शन केले.

‘स्पॉटेडसेल बार्ब’चा शोध बंगालच्या ईशान्य भागातून हॅमिल्टनने १८२२ मध्ये लावला. अगोदर हा मासा फक्त गंगा आणि ब्रह्मपुत्रा व त्यांच्या उपनदीमध्येच मिळायचा. २०१५ मध्ये हा मासा तमिळनाडूमध्ये मिळाल्याची नोंद आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरण बॅक वॉटरमध्ये या माशाला शोधून काढले. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये इंडोनेशियाच्या टॅप्रोबॅनिका या आंतरराष्ट्रीय पत्रिकेत याचा शोधनिबंध शॉर्टनोट प्रसिद्ध झाला, हे आमचे यश आहे, असे श्री. शिंदे, श्री. देवरे यांनी सांगितले.

हेही वाचा: वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

...असा आहे मासा

खोल शरीर, शंकूच्या आकाराचे डोके, पंख फिकट नारिंगी रंगाचे हे मासे असतात. नारांमधे हा रंग थोडा गडद असतो. लांबी साधारण ३.५ सेंटीमीटर असते. शरीर चंदेरी रंगाचे असून, कल्याशेजारी काळापट्टा, शेपटीकडे २ काळे ठिपके असतात. गोड्या पाण्यातील जलीय वनस्पतींमध्ये गुरामी मासे, इतर बार्ब प्रजातीसोबत विचरण करतात.

''तापी व तिच्या उपनद्यांमध्ये वन्यजीव सरंक्षण संस्था मागील चार वर्षांपासून जलीय जीवन जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात हा मासा वाघूर धरणात आढळून आला. महाराष्ट्रातून आम्ही घेतलेली ही पहिलीच नोंद असून, जळगाव जिल्ह्यातील जलाशयात हा मासा आढळणे, ही भूषणावह बाब आहे.'' -गौरव शिंदे, मस्त्य अभ्यासक

Spotted Barb fish
Government Job : बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सैन्यात अधिकारी होण्याची संधी

''जिल्ह्यातील जलीय परिसंस्था समृद्ध आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या माध्यमातून आम्ही जलीय जैवविविधता जगासमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. खानदेशातील जलशयांवर अभ्यास करण्यास खूप वाव आहे. नवोदित अभ्यासकांनी पुढे आले पाहिजे.'' -बाळकृष्ण देवरे, वन्यजीव संरक्षण संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.