जळगाव : जिल्हा एसटी (ST) कर्मचारी पतपेढीची निवडणूक नुकतीच झाली. यात प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ॲड. सदावर्ते प्रणीत कष्टकरी जनसंघाने बाजी मारली.
यात सर्व १७ जागा जिंकून विरोधातील तिन्ही पक्षांचा मोठा पराभव केला आहे.(ST Credit Union Election Kashtkari Jan Sangh won all 17 seats jalgaon news)
चेअरमनपदासाठी जामनेरचे अमोल सुरवडकर यांच्या नावाची चर्चा आहे.जिल्हा एसटी कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीची मतमोजणी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत वीरकर यांच्या अध्यक्षतेाली झाली. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या विभागांतील दोन हजार ९२५ सभासद असलेल्या पतसंस्थेच्या निवडणुकीकडे लक्ष लागून होते.
मागील वर्षी झालेल्या संपाचे नेतृत्व करणारे गुणरत्न सदावर्ते यांचे पॅनल, तर दुसरीकडे नामांकती संघटनांचे एकत्रित लढलेले तीन पॅनलसमोर उभे होते. संचालकपदाच्या १७ जागांसाठी या निवडणुकीत प्रस्थापितांना एकही जागा जिंकता आली नाही. विजयानंतर सर्व उमेदवारांसह समर्थकांनी एसटी आगारात गुलाल उधळून जल्लोष केला.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
४७७ मते बाद
एसटी कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत एका मतदाराला सर्वसाधारण मतपत्रिकेत १२ मते देण्याचा अधिकार होता. अनेकांनी १२ पेक्षा अधिक फुली मारल्याने तब्बल १७३ मते बाद झाली, तसेच महिला राखीव मतदारसंघात ५६, इतर मागासवर्ग प्रवर्गात ६१, विमुक्त जाती- भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गात ६८, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात तब्बल ११९, असे एकूण तब्बल ४७७ मते बाद झाली.
विजयी झालेले उमेदवार असे
सर्वसाधारण मतदारसंघात पंडित पाटील, प्रवीण मिस्तरी, विनोद गवळे, समाधान पाटील, देवेंद्र ठाकरे, रामराव राठोड, निंबा राजपूत, जितेंद्र पाटील, डिगंबर सोनवणे, नरेंद्रकुमार रायसिंग, राजेश ठाकूर, दीपक नागपुरे, महिला राखीव मतदारसंघात चारुलता घरटे, शुभांगिनी सोनवणे, इतर मागासवर्ग मतदारसंघात अमोल सुरवडकर, विमुक्त जाती- भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गात नाना बाविस्कर, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात अमीन तडवी विजयी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.