Jalgaon News : ‘लाल सिग्नल क्रॉस’चे प्रमाण्य नगण्य; लोकोपायलटचा प्रभावी वापराने गाडींचा वाढला वेग

Electrification underway by Railway Electricity Department.
Electrification underway by Railway Electricity Department.esakal
Updated on

Jalgaon News : यंदा रेल्वे लोको पायलटांना वेळोवेळी सुरक्षेबद्दल मार्गदर्शन झाल्याने लाल सिग्नल क्रॉस करण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे. यामुळे अपघाताचे प्रमाणही कमी आहे. नवीन जळगाव ते पाचोरा एकूण ५० किलोमीटरच्या तिसऱ्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.

ही कामगिरी भुसावळ रेल्वे विद्युत विभागाने केली आहे. (Standard of red signal cross negligible Effective use of loco pilot increased speed of trains Jalgaon News)

भारतीय रेल्वेत विद्युत विभागाचे पाहिला सामान्य, दुसरा वितरण, तिसरा ट्रेन ऑपरेशन, असे तीन विभाग असून, त्यांचे कार्यही वेगवेगळे आहेत. विभागाचे प्रमुख वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता निखिलकुमार सिंग (वितरण), ट्रेन ऑपरेशन वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता आर्शद आलम खान यांच्या नेतृत्वखाली ही कामगिरी केली आहे.

तिसऱ्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण

भुसावळ विभागात नव्याने बांधलेल्या भुसावळ ते जळगाव एकूण ३१.३० किलोमीटर लांबीच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. इलेक्ट्रिक इंजिनसहित गाडी चौथ्या मार्गाने नेता येते. जळगाव ते पाचोरा एकूण ५० किलोमीटरच्या तिसऱ्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.

नव्याने सुरू झालेल्या अंकाई मालाच्या गुदामाचे लोडिंग/अनलोडिंगसाठी नवीन रेल्वे मार्गावर विद्युतीकरण झाले आहे. बडनेरा गुड्स यार्ड लाइन्सचे नवीन विद्युतीकरण यार्ड लाइन्सच्या स्थिरीकरणासाठी झाले आहे. बडनेरा येथे नवीन वॅगन दुरुस्ती कारखान्यात दुरुस्तीसाठी येणाऱ्या वॅगनसाठी लाइनवर विद्युतीकरण झाले आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Electrification underway by Railway Electricity Department.
Heat Stroke : उष्माघाताचा पहिला बळी; शेतात काम करताना मजुराचा मृत्यू

अपघातांचे प्रमाण कमी

भुसावळ विभागात २०२१-२२ मध्ये रेल्वेचालकाकडून ट्रेन लाल सिग्नल पास केल्यामुळे चार छोटे अपघात झाले होते. मात्र, २०२२-२३ वर्षात रेल्वेचालकांकडून अशा कोणत्याही चुका झाल्या नाहीत. कोणताही लाल सिग्नल पास झाला नाही.

सुरक्षितता मोहीम

अपघात कमी होण्यासाठी रेल्वेचालक आणि गार्ड यांच्या मार्गदर्शनासाठी एकूण ४३ सुरक्षा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

"या वर्षात लोको पायलटांना वेळोवेळी सुरक्षेबद्दल मार्गदर्शन झाल्याने लाल सिग्नल क्रॉस करण्याचे प्रमाण नसणे, ही आनंदची गोष्ट आहे. भुसावळ विभागात इलेक्ट्रिकफिकेशन पूर्ण झाले आहे. जसजशी नवीन लाइन पूर्ण होत जाईल, तसे लाइनवर इलेक्ट्रिकफिकेशनचे काम पूर्ण केले जाईल." -एस. एस. केडिया, डीआरएम, भुसावळ

Electrification underway by Railway Electricity Department.
Nashik News : सक्तीने वर्गणी घेतल्यास खंडणीचा गुन्हा; सोमनाथ तांबे यांचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.