Jalgaon News : राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची चाळीसगावला भेट

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासन सज्ज झाले आहे.
Chief Electoral Officer Shrikant Deshpande during inspection at Chavan College
Chief Electoral Officer Shrikant Deshpande during inspection at Chavan Collegeesakal
Updated on

Jalgaon News : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अप्पर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी गुरुवारी (ता. १) येथील मतदान साहित्य वाटप व स्वीकृती केंद्राला भेट देऊन स्थानिक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या भेटीच्या निमित्ताने श्री. देशपांडे यांनी जगविख्यात केकी मूस कलादालनाची पाहणी केली.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासन सज्ज झाले आहे. त्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी तथा अप्पर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांची ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. (State Chief Electoral Officer visit to Chalisgaon jalgaon news)

शहरातील हिरापूर रोडवरील नानासाहेब य. ना. चव्हाण महाविद्यालयात मतदान साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र राहणार आहे. या ठिकाणी मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्यासाठी श्री. देशपांडे यांनी सुरक्षा कक्षाची पाहणी केली.

या वेळी प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव यांनी श्री. देशपांडे यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत केले.

Chief Electoral Officer Shrikant Deshpande during inspection at Chavan College
Jalgaon News : कर्जमाफीच्या संदेशापासून ग्राहकांनी सावध राहावे; ‘RBI’चे नागरिकांना आवाहन

महाविद्यालयात मतदान नोंदणी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती प्रा. डॉ. विजय शिरसाठ यांनी दिली.

जास्तीत जास्त मतदार नोंदणीचे आवाहन श्री. देशपांडे यांनी केले. उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, तहसीलदार प्रशांत पाटील, निवडणूक नायब तहसीलदार डॉ. संदेश निकुंभ, प्राचार्य डॉ. जाधव, नोडल अधिकारी प्रा. डॉ. विजय शिरसाठ आदी उपस्थित होते.

Chief Electoral Officer Shrikant Deshpande during inspection at Chavan College
Jalgaon Election News : अत्याधुनिक तंत्रामुळे ‘इव्हीएम’ हॅक होऊ शकत नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.