Jalgaon News : Talent Searchच्या गुणवंताचा अभ्यास दौरा; विविध अनुसंधान केंद्रांना भेटी

Teachers with students on a visit to an international Indian plasma research center.
Teachers with students on a visit to an international Indian plasma research center.esakal
Updated on

अमळनेर (जि. जळगाव) : नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने दरवर्षी राज्यस्तरीय नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना नि:शुल्क इस्रो, आयआयटी, सायन्स सिटी आदी उच्च-तंत्र व शिक्षण संस्थांना विज्ञान अभ्यास दौऱ्यावर (सहल) नेण्यात येते.

२०२१ मधील राज्यातील २६ जिल्ह्यातील यशवंत ५८ विद्यार्थी व ६ शिक्षकांची विज्ञान अभ्यास सहल नोबेल फाउंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात नुकतीच यशस्वीपणे पार पडली. या परीक्षेच्या माध्यमातून सहावा विज्ञान अभ्यास दौरा होता. नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेच्या माध्यमातून आतापर्यंत ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यासारख्या संशोधन संस्थांना भेटी दिल्या आहेत. (state Talent Search successful students study tour Visits to various research centers Jalgaon News)

या अभ्यास दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गांधीनगर येथे रोबोटिक लॅबोरेटरी, देशातील सर्वात गतिमान द्वितीय क्रमांकाचे परम अनंता संगणक, विविध विभागांच्या प्रयोगशाळा तसेच क्रिएटिव्ह लर्निंग लॅब या ठिकाणी भेटी दिल्या. या वेळी आयआयटी येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले.

ग्रामीण महाराष्ट्रातील एकूण २६ जिल्ह्यातील विद्यार्थी या दौऱ्यात सहभागी झालेले होते. या दौऱ्यातील सर्वात विशेष बाब म्हणजे संपूर्ण जगात पदार्थाची चौथी अवस्था प्लाजमा यावर एकूण सहा देश संशोधन करीत आहेत. यातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्था भारतीय प्लाजमा अनुसंधान केंद्राला विद्यार्थ्यांनी प्रथमच भेट दिली.

यावेळी प्लाझ्मा अनुसंधान केंद्राचे नरेंद्रसिंह चौहान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्लाजमा निर्मितीसाठी वापरले जाणारे आदित्य आणि टोकोमेक या सयंत्रांची पाहणी करून प्रत्यक्ष प्लाजमा तयार होताना पाहिला. तसेच फ्रान्स , रशिया,अमेरिका ,इंग्लंड,जर्मनी यांच्या मदतीने भारतात सुरू असलेले संशोधन कार्य याबाबत माहिती जाणून घेतली.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

Teachers with students on a visit to an international Indian plasma research center.
Nandurbar News : तब्बल ३७ वर्षांनंतर प्रशासकराज! तळोदा पालिकेचा कारभार प्रशासकांकडे

यासोबतच सायन्स सिटी अहमदाबाद येथे रोबोटिक पार्क, नेचर पार्क, पृथ्वीवरील मानवी उत्क्रांतीची प्रक्रिया तसेच इस्त्रोने उभारलेल्या स्पेस लॅब येथे भेट दिली. इस्रोने उभारलेल्या स्पेस लॅब येथे पीएसएलव्ही रॉकेट उड्डाणाच्या प्रत्यक्ष प्रयोगाची विद्यार्थ्यांसाठी पर्वणी लाभली होती.

या दौऱ्यात विद्यार्थ्यांनी अक्षरधाम मंदिर, साबरमती आश्रम, कांकरिया लेक या ठिकाणी सुद्धा भेट दिली. संपूर्ण अभ्यास दौऱ्याच्या यशस्वितेसाठी अमोल पवार, उमेश काटे, दत्तात्रय सोनवणे, विकास मुके, आरती पाटील, प्रा. निकिता काटे यांनी परिश्रम घेतले.

Teachers with students on a visit to an international Indian plasma research center.
Health Department Recruitment : पीबी बीएसस्सी नर्सिंग उमेदवारांना डावलले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()