महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक

तातडीच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांची घ्यावी परवानगी लागणार आहे.
Stay of Revenue Officer Transfers
Stay of Revenue Officer Transferssakal
Updated on

जळगाव : जिल्ह्यासह राज्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्यांना जूनअखेरपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश उपसचिव गीता कुलकर्णी यांनी शुक्रवारी (ता. २७) दिले आहेत. शासकीय कर्मचाऱ्याच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५’ अन्वये करण्यात येणाऱ्या बदल्या यंदा ३० जून २०२२ पर्यंत करू नयेत, असे आदेशात म्हटले आहे. (Stay of Revenue Officer Transfers)

प्रशासकीय कारणास्तव एखादी बदली करणे आवश्‍यक असल्यास अशी बदली मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने करावी, असे आदेशित करण्यात आले आहे. या आदेशामुळे बदल्यांसाठी फिल्डींग लावणाऱ्या अधिकाऱ्यांची किमान एक महिना तरी गोची होणार आहे. मे-जून महिना म्हटला की महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम असतो. कर्मचाऱ्यांच्या बदल्या अंतर्गत असल्याने त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने होतात. मात्र अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनस्तरावरूनच होतात. ‘वजनदार’ पदावरील बदलीसाठी ‘वजन’ही दमदार असावे लागते. आपली अमूक ठिकाण, अमूक पदासाठी बदली व्हावी यासाठी हवा तसे वजन ठेवायला अधिकारी तयार असतात. यामुळे या अधिकाऱ्यांच्या बदल्या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. राज्यातील अधिकाऱ्यांनी तशी फिल्डींगही लावली आहे. आगामी तीन-चार दिवसात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांना बदलीचे पत्रही मिळणार होते. मात्र आजच्या आदेशाने बदलीपात्र व इच्छुक ठिकाणी बदली करवून घेणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Stay of Revenue Officer Transfers
महसुलाच्या उत्पन्नात होणार वाढ; 12 गावांचे पोटखराब क्षेत्र लागवडीखाली

जिल्ह्यातील लिपिकांच्या सोमवारी बदल्या

जळगाव जिल्ह्यात ७१ अव्वल कारकून, सात वाहन चालक, तेरा मंडळाधिकारी यांच्या बदल्या काल झाल्या. त्यांचे समुपदेशन करून लागलीच बदलीचे पत्र देण्यात आले. आता लिपिक, महसूल सहाय्यकांचे समुपदेशन येत्या सोमवारी (ता.३०)होणार आहे. त्यानंतर त्यांच्या बदल्या होतील. या बदल्यांना मात्र स्थगिती नसल्याचे सांगण्यात आले.

Stay of Revenue Officer Transfers
दिव्यांगाच्या कलाकृतीची ‘इंडिया बुक रेकॉर्ड'कडून दखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()