जळगाव : शहरातील अयोध्यानगरात भाडेकरूच्या बंद घराचे कुलूप तोडून तीन लाख ९७ हजारांचे दागिने आणि रोकड लंपास केली. गेली दहा वर्षे कंपनीत सलग बारा-बारा तास अंगतोड मेहनत करून घर घेण्यासाठी जमविलेली संपत्ती चोरीला गेल्याने सोनार दांपत्य दोन दिवसांपासून अश्रू ढासळत आहे. (Stealing 10 years of earnings ruined dream of buying house Jalgaon crime news)
हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
एका खासगी कंपनीत मशीन ऑपरेटर असलेले सनी विकास सोनार (वय ३२) पत्नी व दोन मुलांसह अशोकनगरात भाड्याच्या खोलीत राहतात. सोमवारी (ता. २) छोटेशे घर बघण्यासाठी दांपत्य राहत्या घराला कुलूप लावून गेले होते. परतल्यावर त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसले.
चोरट्याने घरातील कपाट तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड, असा एकूण तीन लाख ९७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे कळताच पती-पत्नीने डोक्याला हात लावतच आक्रोश केला.
माहिती मिळाल्यावर एमआयडीसीच्या पोलिस पथकाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. याबाबत अज्ञात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक नीलेश गोसावी तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.