Jalgaon Crime : चोरीस गेलेले 22 लाखांचे दागिने व्यापाऱ्यांना परत; 48 तासांत उकल

Jalgaon Crime : चोरीस गेलेले 22 लाखांचे दागिने व्यापाऱ्यांना परत; 48 तासांत उकल
esakal
Updated on

चाळीसगाव : पार्सलची डिलिव्हरी करणाऱ्याची (कुरिअर डिलिव्हरी) २२ लाख ४३ हजार चारशे रुपयांची सोन्याचे दागिने असलेली कापडी पिशवी रेल्वेतून लंपास केल्याची फिर्याद येथील रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत रेल्वे पोलिसांनी मुद्देमालासह संशयिताना अटक करून संपूर्ण माल जप्त केला.

जळगाव ते मुंबई रेल्वेच्या (गाडी क्रमांक १२८१० अप) बोगी क्रमांक एस/६ बर्थ नंबर ३३ मधून हरिश्‍चंद्र खंडू वरखेडे (वय ६४) हे प्रवास करीत होते. रेल्वे पाचोरा येथून जात असताना सतवीरसिंग बळवंतसिंग टाक (वय १९, रा. तांबापुरा, जळगाव) व त्याचा साथीदार यांनी तुमची बर्थजवळची खिडकी लावतो, या बहाण्याने वरखेडे यांच्या खिडकीजवळ आले आणि खिडकी लावून बर्थवर ठेवलेली भुरकट रंगाची कापडी पिशवी अलगद उचलून नेली.

पिशवीत ४२२ ग्रॅम ८१ मिली वजनाचे दागिने (किंमत २१ लाख ९१ हजार रुपये) व ५२ हजार ४०० रुपये रोख असा एकूण २२ लाख ४३ हजार ४०० रुपये किमतीचा ऐवज होता. रेल्वे पोलिसांनी या गुन्ह्यात सहा जणांना अटक केली.

त्यांच्याकडून ४१७ ग्रॅम सोने (अंदाजे किंमत २१ लाख ३० हजार १९७), तीन राशींचे खडे (किंमत रुपये १४ हजार), रोख रक्कम ४६ हजार २०० व ७ हजार असा एकूण २१ लाख ९७ हजार ९९७ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.(Stolen jewels worth 22 lakhs returned to traders by police case solved within 48 hours Jalgaon Crime News)

Jalgaon Crime : चोरीस गेलेले 22 लाखांचे दागिने व्यापाऱ्यांना परत; 48 तासांत उकल
Cricket Team : जळगाव जिल्ह्याचा प्राथमिक संघ जाहीर

जप्त केलेल्या मुद्देमालापैकी कांतिलाल जैन (जळगाव) यांचे १३२ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत रुपये ६ लाख ९१ हजार) व योगेश रोशनलाल कपूर (जळगाव) यांचाचे २८६ ग्रॅम सोने (किंमत रुपये १४ लाख ५ हजार १६०) परत केले. भुसावळ येथील लोहमार्ग न्यायालय यांच्या आदेशानुसार, सोमवारी (ता. ३) मनमाड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी (लोहमार्ग) दीपक काजवे यांच्या हस्ते जळगाव येथील सोन्याचे व्यापारी लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक कांतिलाल जैन व आर. के. ज्वेलर्सचे मालक योगेश कपूर यांना चाळीसगाव येथील रेल्वे पोलिस ठाण्याच्या कार्यालयात देण्यात आला.

संशयिताना अटक करण्यासाठी व त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यासाठी, लोहमार्गचे पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील (औरंगाबाद) व उपविभागीय अधिकारी दीपक काजवे (मनमाड) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक सुरेश भाले, सहाय्यक निरीक्षक गंभीरराव (औरंगाबाद), पोलिस निरीक्षक विजय धेरडे (भुसावळ), सहायक निरीक्षक किसन राख (चाळीसगाव), उपनिरीक्षक शब्बीर शेख (चाळीसगाव) तसेच येथील राजेश पाटील, , फरीद तडवी, मोहसीनली सय्यद, जितेंद्र वाघ, राहुल शार्दूल, या पोलिसांनी व भुसावळ येथील सहाय्यक निरीक्षक मगरे, हवालदार अजित तडवी, जगदीश ठाकूर, सागर खंडारे, धनराज लुले, दिवाणसिंग राजपूत आदी पोलिसांनी चोरीचा माल हस्तगत करण्याकामी सहकार्य केले

Jalgaon Crime : चोरीस गेलेले 22 लाखांचे दागिने व्यापाऱ्यांना परत; 48 तासांत उकल
Jalgaon | सत्ताधारी, प्रशासनाचे विकासावर नव्हे, पंधराव्या मजल्यावर लक्ष : MLA भोळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.