Jalgaon News : पाचोरा तहसीलमधून चोरीस गेलेले वाळूचे डंपर जप्त

Revenue-Department Work News
Revenue-Department Work Newsesakal
Updated on

जळगाव : पाचोरा तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला गेलेले वाळू वाहतुकीचे डंपर जळगाव शहरातील ओम ऑटो सेंटर येथे आढळले असून, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता. ६) डंपर ताब्यात घेतले.

अवैध वाळू वाहतूक करणारे डंपरवर (एमएच १९ झेड ४४३१) ५ ऑक्टोबर २०२२ ला पाचोरा महसूल पथकाने कारवाई करून डंपर पाचोरा तहसील कार्यालयाच्या आवारात लावले होते. १२ डिसेंबरला जमा केलेले वाळूचे डंपर चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबत पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. (Stolen sand dumper from Pachore Tehsil seized by revenue department Jalgaon News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Revenue-Department Work News
Jalgaon News : 12 बाजार समित्यांच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा

गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी डंपरचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकातील हवालदार अशरफ शेख, पोलिस नाईक लक्ष्मण पाटील, रणजित जाधव, विनोद पाटील, किशोर राठोड यांना कारवाईसाठी रवाना केले.

ते डंपर जळगाव शहरातील ओम ऑटो सेंटर येथे प्लॅस्टिकच्या ताडपत्रीने झाकला असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने घटनास्थळी जाऊन चोरीला गेलेले डंपर ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी पाचोरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Revenue-Department Work News
Nashik News : 4 उपनद्यांसह 67 नाल्यांना पुनर्वैभव! मुंबई IITचा मिठी नदीच्या धर्तीवर प्रकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.