Jalgaon Crime News : जिल्ह्याचे मुख्य आगार असलेल्या नवीन बसस्थानकात पेट्रोल पंपासमोर ड्यूटी लावण्याच्या कारणावरून बसचालकाला एकाने दगडाने मारून डोक्याला व हाताला गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवार (ता.२९) रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे.
जिल्हापेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी एका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (stone on head of bus driver for imposing duty jalgaon crime news)
दाखल तक्रारीनुसार योगेश धर्मराज माळी (वय ४३, रा. कौशल्यनगर, पाळधी ता.धरणगाव) जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात बस चालक म्हणून नोकरीला आहे. सोमवार (ता.२९) रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानक डेपो मधील पेट्रोल पंपाजवळ ड्यूटी राहण्याच्या कारणावरून शिवम संजय सूर्यवंशी (रा. जळगाव) याने बसचालक योगेश माळी यांच्याशी वाद झाला.
वादाचे पर्यावसन हाणामारीत होवुन शिवम सूर्यवंशी याने चालक योगेश माळी यांच्या डोक्यात दगड हाणल्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर रात्री १० वाजता चालक योगेश माळी यांनी दिलेल्या जबाबावरून शुभम संजय सूर्यवंशी यांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक सलीम तडवी करीत आहे.
बेशिस्त कारभार
जळगाव जिल्ह्याचे मुख्य आगार असलेल्या नवीन बसस्थानकात ड्युट्या लावण्यावरुन नेहमीच वाद हाणामारीचे प्रकार घडत असतात. काही खास चालक आणि गटबाजी करून राहणाऱ्या टोळक्यालाच पसंतीच्या ड्युट्या देण्याचा प्रघात आहे. त्यासाठी ड्यूटी लावणार्याला ठरलेली रक्कम दिली की, त्याच -त्या लोकांना पसंतीच्या ट्रीप आणि ओव्हर टाईमच्या ड्युट्यांवर पाठवले जाते.
नियमाने चालणाऱ्या एकटे-दुकटे चालकांना ड्यूटी मास्टर जुमानत नसून ज्या ड्युट्या कोणी घेत नाही. त्याच ड्युट्या अशा चालकांना दिल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वीही आल्या आहेत. तरी, महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष पुरवून ड्युट्या लावण्याचा आगारातील हा अवैध धंदा बंद करावा नियमाने ड्युट्या मिळाव्या अशी मागणी काही चालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.