Jalgaon Curfew News : अमळनेरला 2 गटांत दगडफेक; शहरात तीन दिवस संचारबंदी लागू

Jalgaon Curfew News
Jalgaon Curfew Newsesakal
Updated on

Jalgaon News : शहरात शुक्रवारी (ता. ९) रात्री दोन गटात तुफान दगडफेक झाली असून, विविध ठिकाणी धार्मिक स्थळांवर ही दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले आहे.

एका पोलिस अधिकाऱ्यावर तलवार हल्ला करून दगडफेकीत तीन अधिकारी व तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. (Stone pelting at Amalner in two groups Seven employees including police officer injured Curfew imposed in city for three days Jalgaon News)

दोन्ही गटातील ६१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर २९ जणांना अटक करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी तीन दिवसांसाठी १४४ कलम प्रमाणे संचारबंदी जाहीर केली आहे.

शहरातील जीनगर गल्लीत शुक्रवारी (ता. ९) रात्री साडेदहाच्या सुमारास दोन गटांत दगडफेक सुरू असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, पोलिस उपनिरीक्षक भय्यासाहेब देशमुख पोलिस ताफ्यासह हजर झाले.

Jalgaon Curfew News
Jalgaon News : केळीचे साडेबाराशे हेक्टर क्षेत्रावर नुकसान; तालुक्यात चक्रीवादळाचा तडाखा
Curfew imposed in city
Curfew imposed in cityesakal

काही वेळात प्रभारी अधिकारी रामदास वाकोडे पारोळा पोलिसांसह हजर झाले. तेव्हा दोन्ही गटाच्या हातात लाठ्याकाठ्या दगड होते. पोलिस त्यांना शांततेचे आवाहन करीत असताना त्यांनी धार्मिक घोषणाबाजी केली आणि पोलिसांवर फरश्या व दगडांनी हल्ला चढवला.

एकाने तलवारीने राकेशसिंग परदेशी यांच्यावर वार केला. त्यांनी तो चुकवला असता त्यांच्या पायाला लागून हाड फ्रॅक्चर झाले.

दोन्ही बाजूकडील जमाव आक्रमक होत असतानाच दंगलीचे लोण शहरातील जिनगर गल्ली, पारधी वाडा, पानखिडकी, खड्डा जीन या भागात पसरले. दगडफेकीत पोलिस उपनिरीक्षक देशमुख, पोलिस कर्मचारी हितेश बेहरे, राहुल पाटील तसेच काही पोलिस कर्मचारी जखमी झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Curfew News
Priyanka Chopra New Look: प्रियांकाची झलक सगळ्यात अलग! भारत असो वा इटली चर्चा तर होणारच..

घटनास्थळी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, चोपडा डीवायएसपी कृषिकेश रावळे यांनी रात्री पाहणी करून पोलिसांना आदेश देऊन २९ जणांना ताब्यात घेतले असून, एकूण ६१ जणांवर एपीआय परदेशी यांच्या फिर्यादीवरून जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, दंगल व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalgaon Curfew News
Dhule News : कामे सोडून अफवांना बळी पडू नका; जिल्हाधिकारी जलज शर्मांचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.