Jalgaon Crime : शहरातील सुप्रीम कॉलनीतील ओपन स्पेसवर धार्मिक स्थळाचा ओटा बांधण्यावरून दोन गटांत दगडफेक झाली.
यात पाच जण किरकोळ जखमी झाले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Stone pelting in 2 groups at Supreme Colony Controversy over construction of religious place on open plot Jalgaon Crime)
सुप्रीम कॉलनी व पोलिस कॉलनीच्या मध्ये खुल्या भुखंडावर धार्मिकस्थळावर रविवारी (ता. ९) दुपारी पुन्हा बांधकाम सुरू होते. ४० ते ५० जणांचा जमाव उलटून आला व त्यांनी बांधकामाला विरोध केला.
शाब्दिक चकमक होऊन दोन्ही गट समोरासमोर आले व दगडफेकीला सुरवात झाली. दगडफेकीत रवींद्र राठोड, समाधान राठोड, साजन राठोड, पवन पाटील, दीपक घुगे, श्रीकांतसिंग चौधरी किरकोळ जखमी झाले.
घटनेची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि दंगा नियंत्रक पथक दाखल झाले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यांनी जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
शांतता समितीची बैठक
घटनेनंतर सायंकाळी पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशन नजन पाटील यांच्या उपस्थितीत एमआयडीसी पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली.
ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि मान्यवर, नगरसेवक इब्राहिम पटेल, शोभा चौधरी यांच्यासह दोन्ही समाजाचे नेते उपस्थित होते. बैठकीत शांतता राखण्यासोबतच उपद्रवींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.