जळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात छत्रपती शिवाजीनगर भागातील पुलाखालील भागात खादी ग्रामोद्योगजवळ एसटी (ST) व खासगी वाहनांचा ‘थांबा’ (Stop) करण्यात आला आहे. (Stopping near Khadi village industry is dangerous due to Congestion of vehicles jalgaon news)
पुलाचा चढ व उताराचा भाग असल्याने या ठिकाणी असलेला थांबा अपघातास निमत्रंण देणारा आहे. शिवाजीनगर पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर खादी ग्रामोद्योगजवळ खासगी वाहने उभे राहतात.
ही वाहने ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करीत असतात. याच ठिकाणाहून ते प्रवासी घेतात. त्यामुळे याच ठिकाणी आता एसटी बसचाही थांबा झाला आहे. ग्रामीण भागाकडे जाणारे व ग्रामीण भागातून येणारे प्रवासी याच ठिकाणी चढ-उतार करीत असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
वाहतुकीची कोंडी
खादी ग्रामाद्योगजवळील परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. याठिकाणी फुले मार्केटही आहे. या मार्केटमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी असते. शिवाय टॉवर चौकाचा भाग असल्यामुळे या ठिकाणाहून शहरातील चारही भागांकडे जाण्याचा मार्ग आहे. यामुळे या ठिकाणी वाहनांचीही गर्दी असते. अनेक वेळा या थांब्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
अपघाताचा धोका
छत्रपती शिवाजीनगर पुलावर चढण्याचा व उतरण्याचा हा मार्ग आहे. त्यामुळे पुलावर जाण्यासाठी व पुलावरून येणाऱ्या वाहनांचीही गर्दी असते. थेट पुलाखालीच हा थांबा असल्यामुळे अपघाताचा धोकाही आहे. पुलावरून उतरल्यानंतर प्रवासी उतरण्यासाठी एसटी बस येथे थांबते. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनधारकास उतारावरून वाहन थांबविणे कठीण होते. त्यामुळे अपघात होण्याचा धोकाही असतो.
वाहन थांबा बंद करण्याची गरज
शहराच्या मध्यवर्ती भागातील हा वाहन थांबा अपघात रोखण्यासाठी बंद करणे गरजेचे आहे. पर्यायी जागा शोधून त्या ठिकाणी हा वाहन थांबा करावा. भविष्यात अपघात झाल्यास यात हलगर्जीपणा करणारे अधिकारी जबाबदार असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.