Jalgaon News : भडगाव तालुक्यात वादळाचे थैमान; परिसरात लिंबू बागांचे नुकसान

Storm damage to lemon orchards.
Storm damage to lemon orchards. esakal
Updated on

Jalgaon News : तालुक्यात गुरुवारी (ता. २०) सायंकाळी आलेल्या वादळाने पिके भुईसपाट केल्याचे चित्र आहे. शिंदी व गुढे परिसरात तर लिंबूच्या बागांमध्ये अक्षरश: सडा पडला होता. बहरलेल्या शेतीचे स्मशान झाल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबायला तयार नव्हते. (Storm surge in Bhadgaon taluka Damage to lemon groves in area jalgaon news)

भडगाव तालुक्यात खरिपातील कापूस हे मुख्य पीक आहे. दहा हजार रुपये भाव मिळेल, या आशेने कापूस साठवून ठेवला. मात्र कापसाचे मार्केट सात हजार ते साडेसात हजारांच्या वर जायला तयार नाही.

त्यामुळे कापूस पिकांसाठी झालेला उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. तर दुसरीकडे रब्बीवर मदार ठेवून असलेल्या शेतकऱ्यांचा पिकांचा गडलेला भावाने चांगलाच हिरमोड झाला आहे. या सुलतानी संकटांनी बेजार झालेल्या शेतकऱ्यांवर आज पुन्हा अस्मानी संकट कोसळल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.

वादळाने पीक जमीनदोस्त

आज सायंकाळी पाचच्या सुमारास तालुक्यात विशेषतः: वडजी, शिंदी परिसरात झालेल्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. मका, ज्वारी, बाजरी जमीनदोस्त झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास वादळाने हिरावून नेल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळाले. शिंदी येथे शेतकरी भाऊसाहेब देवराम पाटील यांच्या शेतात बांधलेला बैल अंगावर वीज पडून मृत्युमुखी पडला.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Storm damage to lemon orchards.
Agriculture News : पावसाचा ‘पॅटर्न’ बदलला, तरी पीक पॅटर्न बदलेना; नगदी पीक म्हणून कापूस, केळीकडेच ओढा..

फळबागायतदार शेतकरी उद्ध्वस्त

वादळ इतके भयानक होते, की गुढे व शिंदी परिसरात लिंबूचे झाड उन्मळून पडले. वडजीत लिंबाचे झाडे, इलेक्ट्रिक खांब पडले. लिंबूच्या बागांमध्ये तर अक्षरश: सडा पडलेला होता. त्यामुळे फळबागायतदार शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे. गुढ्यात तर काही पत्र्यांचे शेडही वादळात उडाले. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी माजी सरंपच सतीश पाटील व भाजपचे किसान सेलचे तालुकाध्यक्ष दादाभाऊ पाटील यांनी केली आहे.

खरीप पेरायचा कसा?

आज आलेल्या वादळी पावसाने हातातोंडाशी आलेले पीक मातीत गेल्याने खरीप हंगाम कसा पेरायचा असा , प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे मायबाप शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

"शिंदी परिसरात वादळाने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. रब्बी हंगाम कसा पेरायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी." - पुरुषोत्तम महाजन तालुकाप्रमुख युवासेना भडगाव

"भडगाव तालुक्यात वादळी पावसाने मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. त्यामुळे तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरिपापूर्वी भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे." -किशोर पाटील आमदार, पाचोरा-भडगाव

Storm damage to lemon orchards.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची जोरदार तयारी; शिवसैनिकांचा उत्साह शिगेला!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.