Seva Sahayog Foundation Jalgaon : सेवा सहयोग फाउंडेशनच्या विद्यार्थी विकास योजनेंतर्गत २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात ३५ जिल्ह्यातील व ७ अन्य राज्यातील ७२१ विद्यार्थ्यांना बारीवनंतरच्या व्यावसायिक शिक्षणासाठी ४ कोटी ६२ लाखाचे अर्थसाहाय्य करण्यात आले.
सेवा सहयोग फाउंडेशनतर्फे राज्यभर विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. त्यापैकीच एक विद्यार्थी विकास योजना हा आहे. (Strength in wings of poor talented 721 students jalgaon news)
समाजातील गरीब परंतु बुद्धिमान विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी मदत करणे हा सेवा सहयोग फाउंडेशनतर्फे मदत दिली जाते. ही योजना १३ वर्षापूर्वी टिजेएसबीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र कर्वे यांच्या संकल्पनेतून साकारली. २००९-२०१० मध्ये पाच विद्यार्थ्यांपासून सुरु झालेला योजनेचा प्रवास २०२२-२३ पर्यंत ७२१ विद्यार्थी विद्यार्थ्यांपर्यंत पोचला आहे.
यंदा विद्यार्थी विकास योजना परिवाराचे ५५३ देणगीदार, ३४९ अन्य हितचिंतक, ७१ पालक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून जवळपास २४.९४ कोटी रुपयांची मदत १५०० हून अधिक विद्यार्थ्यांना करण्यात आली आहे. ठाण्यापासून सुरू झालेला प्रवास मुंबई, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, जळगावपासून संपूर्ण महाराष्ट्रात पोहचला आहे. आगामी काळात संपूर्ण भारतभर पोचवावा असा प्रयत्न सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून १५४९ विद्यार्थांना फायदा झाला.
या योजनेअंतर्गत १६.५९ कोटी रुपये आजपर्यंत केलेले एकूण आर्थिक साहाय्य आहे. ग्रामीण भागातील ८.३५ कोटी रुपये ८ शाळांच्या पुनर्बांधणी साठी खर्च करण्यात आला आहे. योजनेच्या माध्यमातून भारतातील नामांकित ४२ शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे.
योजनेच्या माध्यमातून शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना ५ लाखापासून २० लाखापर्यंतचे पॅकेज मिळत आहेत. ते विद्यार्थीही दायित्व व जाणीव म्हणून या योजनेत योगदान देऊ लागले आहेत. माजी विद्यार्थ्यांनी ३८ लाख रुपये विद्यार्थी विकास योजनेसाठी आतापर्यंत दिले आहेत. या योजनेचा हाच खरा उद्देश असून आज जो घेणारा आहे, तो देणारा होत आहे.
आकडे बोलतात..
योजना वर्ष : १३
व्याप्ती : ३५ जिल्हे, सात राज्य
लाभार्थी : ७२१
देणगीदार : ५५३
हितचिंतक : ३४९
पालक कार्यकर्ते : ७१
२०२३ ला मदत : ४. ६२ कोटी
एकूण मदत : १६.५९ कोटी
''समाजात अनेक प्रश्न आहेत, त्यातल्या त्यात शिक्षण विषयात काम करणे जास्त गरजेचे वाटले. या क्षेत्रात विद्यार्थ्यांना मदतीची प्रचंड गरज आहे. यातून विद्यार्थी विकास योजना सुरू झाली आणि समाजातील आर्थिक परिस्थिती नसलेले मात्र बुद्धिमान विद्यार्थ्यांना वरदान ठरत आहे.''- रवींद्र कर्वे, सेवा सहयोग फाउंडेशन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.