पाचोरा : येथील राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी काँग्रेस व महिला आघाडीच्यावतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात अर्वाच्च शब्द वापरणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तार यांचा तीव्र निषेध करण्यात येऊन प्रतिकात्मक छायाचित्रास चपला, जोडे मारून विटंबना करत दहन करण्यात आले. या वेळी पन्नास खोके एकदम ओके या घोषणांनी शहर दणाणले.
मंगळवारी (ता. 8) सकाळी अकराला राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी काँग्रेस व महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते बाबुराव मराठे व्यापारी संकुलाजवळच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात एकत्रित आले. (Strong protest of Minister Sattar by NCP Defacement and burning of iconic photographs Jalgaon News)
महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, नितीन तावडे, तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अजहर खान, सतीश चौधरी, माजी नगरसेवक भूषण वाघ, अशोक मोरे, रणजित पाटील, हारुण देशमुख, सत्तार पिंजारी, प्रा. प्रदीप वाघ, सुदर्शन सोनवणे, प्रकाश पाटील, ॲड. अविनाश सुतार, ए. जे. महाजन, संजय करंदे, गौरव वाघ, आर. एल. पाटील, अजय अहिरे, प्रताप सूर्यवंशी, गोपी पाटील, प्रा. माणिक पाटील, अशोक चौधरी, आर. जे. पाटील, नरेंद्र ठाकरे, बंडू पाटील, महिला आघाडीच्या रेखा देवरे, अभिलाषा रोकडे, प्रा. वैशाली बोरकर, प्रा. सुनीता मांडोळे, रेखा पाटील, अनिता देवरे, आशा जोगी, जयश्री हिरे, सीमा साईराजा, मुनमुन सीमाजान, शांताबाई सीमाजान, रेणुका सीमाजान, गंगोत्री सीमाजान या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी काँग्रेस व महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात यावे, राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले. विकास पाटील यांनी आभार व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.