Jalgaon Crime : शिक्षकाकडून विद्यार्थ्याला लोखंडी पाइपने मारहाण; बोदवडला गुन्हा दाखल

Beating News
Beating Newsesakal
Updated on

Jalgaon Crime : येथील चंद्रकांत हरी बढे उर्दू हायस्कूलमध्ये नववीत शिकणार्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापक व एका शिक्षकाने मुलांच्या भांडणांच्या कारणावरून लोखंडी पाइपने मारहाण केली व घरी नाव सांगितले तर शाळेतून नाव काढून टाकू, अशी धमकी दिली.

याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या फिर्यादीवरून मुख्याध्यापक व शिक्षकाविरुद्ध मंगळवारी (ता. ५) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Student beaten by teacher with iron pipe jalgaon crime news)

बोदवड येथील चंद्रकांत हरी बढे उर्दू हायस्कूलमध्ये शेख तनवीर शेख शरीफ मन्यार हा इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. २४ ऑगस्टला शाळेतील शिक्षक अत्तर उल्ला खान शहीद उल्ला खान यांनी मुख्याध्यापक नदीम खान नसीम खान यांच्या कार्यालयात बोलावून तनवीर यास शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी व लोखंडी बेदम मारहाण केली.

आज पुन्हा शाळेत उशिरा पोहोचला या कारणावरून तनवीर याला अत्तर उल्ला खान व मुख्याध्यापक नदीम खान यांनी लोखंडी पाइप व चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून सोबत शाळा सोडल्याचा दाखला देऊन त्याला घरी पाठवले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Beating News
Jalgaon Crime : भुसावळला 7 घरफोड्या उघड; दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

त्यामुळे तनवीरच्या वडिलांनी तनवीरवर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

या प्रकरणी फिर्यादी शरीफ इब्राहिम मण्यार यांच्या फिर्यादीवरून नदीम खान व अत्तर उल्ला खान शाहीद उल्ला खान या दोघांविरुद्ध बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलिस अंकुश जाधव करीत आहेत

Beating News
Jalgaon Fraud Crime : निर्मल सीडस ब्रॅन्डद्वारे फसवणूक करणाऱ्या कंपनीविरुद्ध कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.