Jalgaon News : जेईईत अपयश आल्याने विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

जेईई परीक्षेत कमी गुण मिळाल्याने निराश परीक्षार्थी यश गणेश खर्चे (वय १८, रा. जोशीवाडा, मेहरुण) या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.
Dead
Dead esakal
Updated on

Jalgaon News : जेईई परीक्षेत कमी गुण मिळाल्याने निराश परीक्षार्थी यश गणेश खर्चे (वय १८, रा. जोशीवाडा, मेहरुण) या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मेहरुण येथील जोशीवाडा परिसरात यश खर्चे हा आई-वडिलांसह वास्तव्यास होता. मेहरुणमधील राज विद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. (student took an extreme step after getting low marks in JEE exam jalgaon news)

मंगळवार(ता.१३) रोजी जेईई परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत यशला कमी गुण मिळाल्याने तो डिप्रेशनमध्ये जाऊन प्रचंड खिन्न झाला होता. त्यातूनच यशने त्याने हे पाऊल उचलल्याचे त्याचे मामा महेंद्र सोनवणे यांनी सांगितले.

घटनेच्या पूर्वी मंगळवार (ता.१३) रात्री कुटुंबीयांसह त्याने जेवण केले. त्यानंतर तो वरच्या मजल्यावरील त्याच्या खोलीत गेला. बुधवार (ता.१४) रोजी सकाळी यश अद्याप कसा खाली येत नाही म्हणून त्याची आई त्याला उठविण्यासाठी गेली.

Dead
Jalgaon News : विद्यार्थ्यांनो आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरे जा : सचिव डॉ.पी.आर. चौधरी

बराच वेळ दार ठोठावून आवाज दिला तरी प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला. त्या वेळी घरात मुलगा गळफास घेतला आढळून आल्याने कुटुंबीयांना जबर धक्का बसला. या अवस्थेत मुलगा दिसताच त्याच्या आईने हंबरडा फोडत आक्रोश केला.

शेजाऱ्यांनी मदतीला धाव घेत यशला खाली उतरवून जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Dead
Aditya Thackeray Jalgaon Daura : शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.