तरुणांनी बनविले सौरऊर्जेवरील वाळू चाळणी यंत्र; ताशी 2 क्विंटल क्षमता

Machine by Students
Machine by Studentsesakal
Updated on

जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र विभागातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारे वाळू चाळणी यंत्र बनविले आहे.

वाळू चाळणी सहसा नदीपात्रामध्ये मजुरांद्वारे केली जाते. ही प्रक्रिया खूपच श्रमिक व वेळ खाणारी असते, तसेच नदीपात्र असे ठिकाण आहे, जिथे वीज ऊर्जा उपलब्ध नसते. त्यामुळे वीज ऊर्जेवर चालणारे, कुठलेही यंत्र वापरण्यास अडचण येते. ही बाब लक्षात घेऊन, तसेच वाळू मजुरांशी चर्चा केल्यानंतर हा प्रश्न आपण सौरऊर्जेद्वारे सहज सोडवू शकतो, असे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले.

Machine by Students
एकाच घरात दोन मंत्री बाळासाहेबांना मान्य असतं का? केसरकरांचा सवाल

असे आहे यंत्र

या यंत्रात सौरऊर्जेचे रूपांतर वीज ऊर्जेत करून, ती बॅटरीमध्ये साठवली जाते. वीज ऊर्जेच्या मदतीने इलेक्ट्रिक मोटार फिरविली जाते. इलेक्ट्रिक मोटारपासून मिळणारे रोटरी मोशन, क्रँक मेकॅनिझमच्या सहाय्याने व्हायब्रेटरी मोशनमध्ये रूपांतरित केले जाते व चाळणी यंत्र कार्यान्वित होते. यंत्राची क्षमता ताशी दोन क्विंटल वाळू गाळणी करण्याएवढी आहे. एकदा बॅटरी संपूर्ण चार्ज केल्यावर, यंत्र सतत तीस तास सुरू राहू शकते.

Machine by Students
रेल्वेलाइनवर अंधारलेल्या गरिबीचा संघर्ष; वास्तवाने अंतर्मन स्तब्ध

या विद्यार्थ्यांचा सहभाग

हा प्रकल्प करताना विद्यार्थी मनीष कोलते, शुभम शिंपी, भूषण पाटील आणि मोहमंद खान यांना प्रा. प्रवीण पाटील, प्रकल्प समन्वयक प्रा. किशोर महाजन व विभागप्रमुख प्रा. तुषार कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य विजयकुमार पाटील यांनी या उपकरणाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.